दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा । जाणून घ्या दत्तात्रेयांची पूजाविधी व कथा

0

जाणून घ्या दत्तात्रेयांची पूजाविधी

मागाशीर्ष महिन्याच्या पोर्णिमेदिवशी भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाते . याच  दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता . यावेळी, हा उत्सव शनिवार 22 डिसेंबरला आहे. धार्मिक ग्रंथानुसार, दत्तात्रय भगवान विष्णुचा अवतार आहेत. श्रीमद्भगवत ग्रंथांनुसार, त्यांना चौदा गुरूंकडून शिक्षण मिळाले होते.

datta jayanti 2018 दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
datta jayanti 2018

दत्तात्रेयांची पूजाविधी पद्धत खालील प्रमाणे आहे

प्रथम, लाल कापडावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ति किंवा चित्र ठेवतात . त्या नंतर त्यांना आव्हाहन केले जाते . पाणी एका स्वच्छ भांड्यात घेऊन जवळ ठेवतात व  उजव्या हातात  एक फूल आणि तांदूळ धान्य घेऊन अशा प्रकारे विनोयोग करतात

ऊं अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।

असे म्हणुन, फुले आणि तांदूळ भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर चढवतात. यानंतर, पाण्याने हात स्वच्छ धुवून दोन्ही हात जोडून जाप स्तुति करतात

जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम।
सर्व रोग हरं देव, दत्तात्रेयमहं भज॥

यांच्यानंतर भगवान दत्तात्रेयांची आरती आणि स्तोत्र वाचतात

जगदुत्पति कत्र्रै च स्थिति संहार हेतवे।
भव पाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
जराजन्म विनाशाय देह शुद्धि कराय च।
दिगम्बर दयामूर्ति दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
कर्पूरकान्ति देहाय ब्रह्ममूर्तिधराय च।
वेदशास्त्रं परिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
ह्रस्व दीर्घ कृशस्थूलं नामगोत्रा विवर्जित।
पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यशरूपाय तथा च वै।
यज्ञ प्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु: अन्ते देव: सदाशिव:।
मूर्तिमय स्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
भोगलयाय भोगाय भोग योग्याय धारिणे।
जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
दिगम्बराय दिव्याय दिव्यरूप धराय च।
सदोदित प्रब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
जम्बूद्वीपे महाक्षेत्रे मातापुर निवासिने।
जयमान सता देवं दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
भिक्षाटनं गृहे ग्रामं पात्रं हेममयं करे।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वक्त्रो चाकाश भूतले।
प्रज्ञानधन बोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
अवधूत सदानन्द परब्रह्म स्वरूपिणे।
विदेह देह रूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
सत्यरूप सदाचार सत्यधर्म परायण।
सत्याश्रम परोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
शूल हस्ताय गदापाणे वनमाला सुकंधर।
यज्ञसूत्रधर ब्रह्मान दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
क्षराक्षरस्वरूपाय परात्पर पराय च।
दत्तमुक्ति परस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
दत्तविद्याठ्य लक्ष्मीशं दत्तस्वात्म स्वरूपिणे।
गुणनिर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
शत्रु नाश करं स्तोत्रं ज्ञान विज्ञान दायकम।
सर्वपाप शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते॥

या  स्त्रोताच्या  नंतर  108 वेळा  खालील दिलेल्या मंत्राचा जाप करत  पूजा संपन्न करतात

ऊं द्रां दत्तात्रेयाय नम:

जाणून घ्या भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची ही कथा आहे

एकदा माता लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांना त्यांच्या पातिव्रत्येबद्दल खूपच अभिमान झाला होता. देवाने लीला रचून त्यांच्या गर्विष्ठपणाचा नाश केले होते.

एक दिवस भटकत भटकत नारद देवलोकात आले.तीनही देवींना एक एक करून सगळ्यांना भेटले  व सांगितले की अत्रिपत्नी अनुसूईया च्या  पुढे आपल्या सर्वांचं सतीत्व काहीच नाही.

त्याच्यानंतर तीनही देवींनी आपापल्या स्वामींना ही गोष्ट सांगून, असे सांगितले की अनुसूइयाच्या पातिव्रत्याबद्दल परीक्षा घ्या.त्यानंतर भगवान शंकर, विष्णु व ब्रह्मा यांनी साधुवेश घेऊन अत्रि मुनि च्या आश्रमाला आले

त्या वेळी आश्रमामध्ये महर्षि अत्री नव्हते . त्या सर्व देवांनी, देवी अनिसुयांकडून भिक्षा मागितल्या पण त्यांनी असे सांगितले की तुम्हाला निर्वस्त्र व्होऊन भिक्षा द्यायला हवी.

हे ऐकून पहिल्यांदा तर अनुसयाला धक्काच बसला!! पण नंतर साधूंचा अपमान व्होऊ नये या भीतीने तिने आपल्या पतिचे स्मरण केले.

आणि म्हंटले की  जर माझं  पातिव्रत्य धर्म सत्य आहे तर हे तिन्ही साधू सहा सहा वर्षांच्या शिशु रूपात बदल व्हावे.त्या नंतर तिन्ही देव शिशु रूपात बदल होऊन रडायला लागले !

तेंव्हा अनुसयाने त्यांची आई व्होऊन, त्यांना आपल्या मांडीवर घेऊन स्तनपान करवले.व पाळण्यात घालून झोकाळा झुळवू लागली.

जेंव्हा तीनही देव आपल्या स्थानावर अजून कसे आले नाहीत हे पाहून चिंतेने सगळ्या देवी व्ह्याकुळ झाल्या.तेंव्हा नारद तिथे येऊन झालेल्या सगळ्या घटनेची हकीकत  सांगितली.

तीनही देवींनी अनुसयापाशी जाऊन क्षमा मागितल्या.तेंव्हा देवी अनुसयाने त्रिदेवांना पूर्वरूप केले.प्रसन्न होऊन त्रिदेवांनी वरदान दिले की आम्हा तिघांचा अंश तुझ्या गर्भातून पुत्ररूपात जन्म घेईल

तेंव्हा ब्रम्हाच्या अंशापासून चंद्र,शंकराच्या अंशापासून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशापासून दत्तात्रेयांचा जन्म झाला

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here