महिला IPS अधिकारीचा व्हिडीओ वायरल ’21 दलितांना फोडून काढले’

0

महिला IPS अधिकारीचा व्हिडीओ वायरल ’21 दलितांना फोडून काढले’

या कृत्यामुळे आयपीएस अधिकारी आणि माजलगांव डीईएसपी भाग्यश्री नवटके यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे.नवटके यांच्या विरोधात सोमवारपर्यंत गुन्हा दाखल नाही झाल्यास न्यायालयात जाणार असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिलाय

मी 21 दलितांना तोडले आहे जे अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी येतात. असे  वक्तव्य या महिला अधिकाऱ्याने म्हंटले आहे.असे धक्कादायक वक्तव्य करणाऱ्या या आयपीएस महिला माजलगाव मधल्या आहेत. डीवायएसपी भाग्यश्री नवटके असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या या वक्तव्याचा  एक व्हिडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

डीवायएसपी असलेल्या भाग्यश्री नवटके यांच्या अशा वक्तव्यावरून सर्व स्तरांमधून  टीकेचा भडीमार होत आहे. आपण मराठा आहात म्हणून मी तुमच्या पाठीवर मारते. जर आपण दलित असता तर मी त्यांना फोडून काढले असते.

अशाच एका प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी सवर्ण होता. अटक करण्याऐवजी त्यांनी त्याला कशी मदत केली व दलितांना कसा धडा शिकवला, असं त्या वायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये बोलत असल्याचे दिसत आहेत. भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा व त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

व्हिडीओ सौजन्य -Dr B R Ambedkar Father of Modern India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here