ही आहे जगातील सर्वात लहान गाय वजन आहे फक्त 4 किलो !!

0

सर्वात लहान गाय !!

अमेरिकेतील मिसिसिपी मध्ये जगातील सर्वात लहान गाय पाहिली गेली आहे. जिचे वजन केवळ 4.5 किलो आहे जे एका मांजरीच्या वजना इतके आहे. मिरर आणि डेलीमेल इत्यादींनी या गाईबद्दल प्रामुख्याने बातम्यांमध्ये स्थान दिले आहे.

worlds smallest cow
आपण जर विचार केला तर लहातुन लहान गाय सुद्धा कमीत कमी एका मोठ्या आकाराच्या बकऱ्या एव्हडे असेल असा तुम्ही विचार करत असाल , ज्याचे वजन देखील 30, 40 किलोच्या कमी नसेल, पण हे आपल्या विचारापेक्षा वेगळे आहे.

आणि त्यांच्यानुसार या गाईचा लहान आकार आणि कमी वजन पाहून त्याच्या मालकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.ते त्याला तपासणीसाठी मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ वेटनरीला सुद्धा गेले.

ही गाय अगदी स्वस्थ आहे

असं असलं तरी, जेव्हा गाईला घेऊन अचंबित असलेले मालक मेडिकल कॉलेज उपचार करण्यासाठी पोहोचले तेव्हा मेडिकल टीम देखील आश्चर्यचकित झाली, पण त्यानंतर टीम ने मानलं की वजन कमी असलं तरीही गाय पूर्णतः स्वस्थ आहे. कॉलेज मध्ये पूर्ण तपासणी नंतर स्पष्ट केले की गाईचं वजन मात्र सामान्य गायींच्या तुलनेत फार कमी आहे, परंतु ही लहान गाय संपूर्णतः निरोगी आहे.

सोशल मीडियावर मिळत आहे प्रेम

त्यानंतर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी ही अनोखी गाय म्हणून सोशल मीडियावर शेअर केले. आणि बघता बघता ही गाय व्हायरल झाली. मेडिकल टीमने आपल्या फेसबुक पेजवर या छोटुकल्या गाईची छायाचित्रे प्रसिद्ध करत त्यांनी कमेंट केली आहे की त्यांना एक केस मिळाला आहे ज्याने त्यांनाही पूर्णपणे आश्चर्यचकित केले आहे. हा एक अचंबित करणारा मामला आहे कारण सामान्यतः सामान्य गाईच्या वजनापासून हिचे वजन  सुमारे 10 पट कमी आहे.

झाले #LilBill

फेसबुक पेजवर या गायची छायाचित्रे आल्यानंतर, लोक या गाईचे फॅन झाले आहेत. आणि बघता बघता #LilBill या हॅशटॅग बरोबर सोशल मीडियावर ट्रेन्डिंग करायला लागले आहे. सर्वकाही या गाईच्या क्युटनेस वर फिदा झाले आहेत. आणि लिटिल बिलच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत एक वेगळा फेसबुक पेज तयार झाले आहे . त्यानंतर मेडिकल टीमने फेसबुकवर लिहिले की लिटिल बिलच्या संबंधित वेळोवेळी माहिती प्रसिद्ध केली जाईल. ते म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी लिटिल बिलला प्रेम दिल्याबद्दल आभार, अर्थातच तिचे  वजन केवळ 10 पौंडच्या जवळ आहे, पण ती अद्ययावत स्वस्थ आहे आणि त्याबद्दल आपल्याला वेळोवेळी  माहिती मिळत जाईल.

Image courtesy Facebook

हे सुद्धा नक्की वाचा –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here