जागतिक मैत्री दिवसाच्या निमित्ताने..
असे म्हणतात एखादा व्यक्ती कसा आहे हे त्याच्या संगतीद्वारे ओळखले जाते. ही संगत म्हणजेच त्याचे मित्र. जीवनात खरे मित्र असलेली व्यक्ती खूप भाग्यवान असते. मैत्री करण्याला कोणतीही मर्यादा नसते, कोणतेही मापदंड नसतात. जिथे विचार जुळतात तीथे मैत्री होते. मैत्रीचा पाया आदर आणि विश्वासावर रचला जातो. चांगले मित्र आपल्याला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहन देतात.
खरा मित्र तो असतो जो कठीण प्रसंग असताना तुमच्यासाठी उभा राहतो. खरा मित्र तुमच्या हसण्यामागील दु:ख आणि तुमच्या शांततेमागील नाराजी समजू शकतो. मैत्रीशिवाय आपण अपूर्ण आहोत. खरी मैत्री म्हणजे अंत नसलेला प्रवास. परस्परांच्या विश्वास आणि मदतीवर मैत्री वाढते. जेव्हा इतर लोक नसतात तेव्हा खरा मित्र तुमच्यासाठी उभा राहतो. संकटाच्या वेळी तो आपल्याला कधीही एकटे सोडणार नाही. तुम्ही भरकटत असल्यास तो साम दाम दंड भेद या साऱ्याचा वापर करुन तुम्हाला वाईट मार्गावरुन योग्य मार्गावर चालण्यास प्रेरित करतो. खरा मित्र तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला स्विकारतच नाही तर त्यासोबतच तो तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी, तुमची ओळख बनण्यासाठी तुम्हाला यथाशक्ति मदत करतो. मैत्रीशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. असे मित्र तुमच्या संपर्कात असतील तर स्वतःला भाग्यवान समजा. तसेच तुम्हीही कोणाचातरी असा खरा मित्र होण्याचा नक्कीच प्रयत्न करा. लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा.
Happy Friendship Day !!