मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..
जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.
रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.
आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
झुकायचं कि झुकवायचं
हे वेळीच लक्षात आलं पाहिजे ……….
Loyal आणि Understanding पार्टनर तर सर्वांनाच हवा,
मग सुरुवात स्वतः पासून का करत नाही
अनुभवाने एक गोष्ट शिकवली,
कोणी कुणाचं नसतं सगळे स्वार्थासाठी गोड बोलत असतात.
आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल,
अश्या लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही.
एकट तर एक……….
पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायच नाही