marathistatus.co

हिवाळा आलाय. रस्त्याने प्रवास करताय ? काळजी घ्या, विचित्र अपघाताचा भयंकर विडीओ. थरकाप ऊडवणारी घटना.

Viral Accident

तुम्ही आतापर्यंत विविध अपघात बघितले असतील. पण आपण आज ज्या अपघाताविषयी चर्चा करणार आहोत तो अत्यंत विचित्र आहे. एकाच ठिकाणी ऊभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांना मागून येणाऱ्या गाड्या धडकत आहेत.

माहिती नुसार सदर अपघात अंदाजे पाच वर्षापूर्वीचा असून दिल्ली आगरा हायवे वरील असल्याचे समजते. आपण यात बघू शकतो की हिवाळ्याचे दिवस असून रस्त्यावर दाट धुके आहेत. वाहन चालकांना वाहन चालवतांना रस्त्यावरील काहीच दिसत नसून पुढे काय आहे याचा काहीच अंदाज येत नाही आहे.

विडीओत आपण पाहू शकतो की आधीच भररस्त्यात एक ट्रॕवल्स बस ऊभी असून बऱ्याचशा चारचाकी गाड्या एकमेकांना धडकून रस्त्यावर अस्ताव्यस्त विखूरलेल्या आहेत. काही लोक अपघातग्रस्त गाड्यांमधून प्रवास्यांना बाहेर काढण्यात, आणि त्यांना बाहेर निघण्यास मदत करण्यात व्यस्त आहे. आणि काही प्रवासी मागून येणाऱ्या गाड्यांना ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एका चारचाकी गाडीतून काही पुरुष आणि महिला प्रवासी यशस्वीपणे बाहेत येतात. आणि त्याचवेळी ड्रायव्हर सिटवरुन ड्रायवर सुध्दा गाडीच्या दाराच्या खिडकीतून बाहेर ऊडी घेतो. मागच्या दारातून एका तरुणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सूरु असतानाच, ती दारात असतानाच मागून भरधाव वेगात एक गाडी येते, रस्त्यावरील लोक त्या गाडीला आरडाओरड करुन थांबवण्याचा प्रयत्न करतात.

पण गाडी येवढ्या वेगात असते की ती कंट्रोल करता येत नाही आणि, मागून जोरात आधीच्या अपघतग्रस्त गाडीला जोरात धडक देते. जी तरुणी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आसते तीला पण गाडीचे दार जोरात लागते, पण सुदैवाने तीला जास्त दुखापत होत नाही.

या दुसऱ्या अपघातग्रस्त गाडीतून लवकर लवकर घाईघाईने काही महिला, मुलं आणि पुरुष बाहेर पडून रस्त्याच्या कडेला जातात. रस्त्यावरील मुलाला ऊचलून बाजूला घेतल्या जाते. तोच डोळ्याची पापणी लवते ना लवते, परत मागून एक चारचाकी गाडी वेगात येऊन या ऊभ्या असलेल्या दुसऱ्या अपघातग्रस्त गाडीला धडक देते.

या अपघाताचे कारण चालकांची निष्काळजीपणा, अती वेग याहीपेक्षा वातावरणात असलेले धुके आहेत असे म्हणावं लागेल. बरेचदा सकाळच्या वेळेस दाट वातावरणात धुक्यांची चादर आच्छादलेली असते. त्याचा आपण गुलाबी थंडीत आस्वाद सुध्दा घेत आसतो. पण याच धुक्यामुळे असाही अपघात होऊ शकतो. तेव्हा जर तुम्ही थंडीच्या दिवसात हायवे वरुन प्रवास करणार असाल तर कृपया काळजी घ्या. लवकर पोहचण्यापेक्षा सुखरुप पोहचने कधीही चांगले. जर रस्त्यावर दाट धुके असतील तर धुके विरळ होत पर्यंत काही वेळ थांबून गेलेलेच बरे.

सदर विडीओ एका प्रत्यक्षदर्शी ने समाजमाध्यमावर टाकलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *