marathistatus.co

जर रेकॉर्ड झाले नसते तर कुणीही विश्वास ठेवला नसता…

बरेचदा आपण विविध अपघात बघतो. पण खुपदा लोक अपघात कश्याप्रकारे झाला याची शहानिशा न करता अपघातात ज्याचे नुकसान झाले किंवा जे अपघात ग्रस्त झाले आहेत त्यांची बाजू घेवून अपघाताचे मुख्य कारण जाणून न घेता पुढच्या चालकावर आरोप करीत असतो. किंवा अपघातातील मोठ्आया वाहनाचीच चूक आहे असे मनोमन ठरवून घेतो. आणि बरेचदा अश्या प्रकरणात लोकांकडून ज्यांना दोषी ठरविल्या जाते त्यांना भर रस्त्यात मारहाण केली जाते किंवा पोलिस कम्प्लेंट केली जाते तसेच नुकसान भरपाई सुद्धा मागितली जाते. पण अपघाताचे कारण काही वेगळेच असू शकते.

Accident Viral Video 

असाच एक अपघाताचा विडीओ समाजमाध्यमांवर बघावयास मिळतो. सदर विडीओ भोपाल येथील असल्यायाचे बोलल्तया जाते. आपण बघू शकतो कि एक पुरुष आणि महिला आपल्या दुचाकीवरून जात आहेत, पुरुष गाडी चालवत असून महिला मागे बसलेली आहे. पण अचानक रस्त्यावर त्याची गाडी एकाएक ब्रेक लागल्यासारखी जागीच थांबते आणि दोघेही दुचाकीवरून खाली पडली.

त्यांच्या मागे असलेल्या दुचाकीवरील व्यक्तीचा रेकॉर्डींग कैमेरा सुरु असून त्यात सर्व शूट होत आहे. त्याच्या गाडीचा थोडासाही धक्का अपघातग्रस्त दुचाकीला लागला नाही, दोन्ही गाड्यांमध्ये अंतर आहे. पण जेव्हा पुढील दुचाकी खाली पडली त्यावेळेस मागील दुचाकी अपघातग्रस्त दुचाकीच्या जवळ जावून थांबते. जर मागील दुचाकी सुद्धा खूप जास्त वेगात असती तर तिचाही अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती.

पुढील दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती खाली पडल्यानंतर मागे असलेली स्त्री लगेच उठून मागच्या दुचाकीस्वाराला दोष ठेवून विचारते कि तुला दिसत नाही का ? आमच्या गाडीला मागून ठोकर का मारली ? पण मागे असलेल्या दुचाकीस्वाराच्या कैमेरामध्ये रेकोर्डिंग होत असल्यामुळे तो आत्मविश्वासाने सांगतो कि “मी तुमच्या गाडीला जराही धक्का मारला नाही. माझ्याकडे रेकोर्डिंग आहे मी तुम्हाला दाखवू शकतो.” तरी ती महिला त्याला म्हणते कि आम्ही असेच रस्त्यात पडलो का ?

जर मागील दुचाकीस्वराकडे रेकोर्डिंग नसती तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता, आणि त्यालाच दोषी ठरवून नाहक त्रासाला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे आपणही कधीही एकच बाजू बघून कुणावरही शहानिशा न करता दोषारोपण करू नये .

सदर विडीओ बघताना आपण विनोदाने बघत असला तरी जर मागील दुचाकी स्वरा कडे जर रेकोर्डिंग नसती तर त्या गंभीर परिणामांना समारे जावे लागले असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *