marathistatus.co

“अवचिन्ह”  प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता पुन्हा एकदा सज्ज I पुढील प्रयोग 16 मार्च 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर

Avchinha

पारितोषिक

मुंबई विभागात स्पर्धेमध्ये पारितोषिक आणि प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई येथे 02 फेब्रुवारी 2025 रोजी जवळपास संपूर्ण भरलेल्या नाट्यगृहात अतिशय उत्साहात आणि अतिशय उत्तम प्रयोग सादर केल्यानंतर प्रेक्षकांच्या मागणीला मान देवून 16 मार्च रविवार रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी 10.30 वाजता प्रयोग सादर होत आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

या नाटकाविषयी काही डीटेल्स देण्यापेक्षा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघून तुम्हाला कळेलच… त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ज्या प्रेक्षकांनी स्पर्धेमध्ये नाटक बघितले ते आवर्जून दुसऱ्या प्रयोगाला हजर होते, आणि मराठी साहित्य संघ येथील प्रयोगाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी पुढील प्रयोगाकरिता आप्तस्वकीय, नातेवाईक, कार्यालयीन सहकारी यांच्या तिकिट्स आधीच बुक केलेल्या आहेत त्याचबरोबर कौतुकाची बाब म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांनी स्वतःकरिता सुद्धा दुसऱ्यांदा तिकिट्स बुक केल्यात. यापेक्षा दुसरे यश कशाला म्हणायला हवे ?

त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांना पूर्ण वर्षातील “मार्च” या डोक्याला शॉट देणाऱ्या महिन्यात थोडा विरंगुळा करून डोकं शांत करायचं आहे आणि कार्यालयीन कामं आणि इतर बाबींचा जो ताण कळत नकळत परिवारातील सदस्यांना दिला जातो त्यातूनही त्यांचा स्ट्रेस कमी करायचा आहे म्हणून आम्ही परत हे नाटक बघायला येणार आहोत असे सांगितले… 

त्याचबरोबर 16 तारखेपर्यंत दहावीच्या विद्यार्थांचीही परीक्षा जवळपास संपून जाणार आहे. फक्त सोशल सायन्स हाच पेपर १७ तारखेला आहे. तोही बऱ्याच विध्यार्थाना नसणारच आहे.  तेव्हा पालक वर्ग आणि विध्यार्थी वर्ग यांनी निखळ मनोरंजन करून आजपर्यत पाळलेल्या परीक्षेच्या टेन्शन ला दूर पळविण्याकरिता नक्कीच या ‘परिवारासोबत बसून बघण्यासारख्या’ या  कलाकृतीचा आस्वाद घ्यावा. कारण आजकाल Electronic Media वर पारिवारिक कार्यक्रम जरा कमीच बघायला मिळतात, आणि जे काही आपल्या समोर वाढल्या जात आहे ते पालक आणि पाल्य यांनी एकमेकांना टाळ्या देवून बघावे एवढे आपण मराठी आई वडील तरी पुढारलेले नाहीच… आणि तसेच तुमच्या या नाटक बघायच्या निर्णयाने मराठी नाट्य कलेला सुद्धा वाव देण्याकरिता आपला हातभार लागेलच.

निर्मात्यांच्या निर्णयाला सलाम

कोणत्यायाही क्षेत्रात काम करत असताना सामाजिक भान असणे आवश्यक आहे. ते राखूनच, आपले सामाजिक कर्तव्य समजून अवचिन्ह या नाटकाच्या निर्मात्यांनी एक अतिशय धाडसाचा निर्णय घेतलेला आहे. निर्मात्यांचे असे म्हणणे आहे कि मनोरंजन हा प्रत्येकाचा हक्क आहे. हा निर्णय विशेष म्हणजे NGO, सामाजिक संस्थांकरिता आहे. ज्या संस्था सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांचे लाभार्थी जसे अनाथ मुले, रस्त्यावरील मुले, कंत्राटी कामगार यांची जर नाटक बघायची इच्छा असेल, पण त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसेल तर त्यांना तिकिटांमध्ये काही सुट देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलेला आहे. तेव्हा आपण जर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, NGO असाल किंवा अशा संस्थांच्या संपर्कात असाल तर नक्कीच तुम्ही हा संदेश त्यांच्यापर्यत पोहचवू शकता. आणि त्यांना सुद्धा मनोरंजन करून घेण्याकरिता सहकार्य करू शकता. 

आवाहन

नाटकाचे लेखक-दिग्दर्शक निलेश जाधव यांनी सुद्धा एक अतिशय सुंदर अनुभव घेण्याकरिता प्रेक्षकांनी दिनांक 16 मार्च 2025 रोजी शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे यावे आणि भरभरून आशीर्वाद द्यावेत असे आव्हान आमच्या माध्यमातून तमाम रसिक नाट्य प्रेक्षकांना केलेला आहे.

त्याचबरोबर मराठी नाट्यश्रुष्टी, रंगभूमी आणि मराठी चित्रपट श्रुष्टी यांना जिवंत ठेवण्याचे काम हे मराठी प्रेक्षकांचे आहे. सध्या मराठी रंगभूमीवर नवनवीन दिग्दर्शक, लेखक कलाकार यांच्या मार्फत नवनवीन कलाकृती निर्माण केल्या जात आहे. महाराष्ट्र शासन आणि विविध संस्थांमार्फत अनेक नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये मराठी रंगभूमीवर प्रेम करणारे, मराठी रंगभूमी करिता तन, मन, धनाने स्वतःला अर्पण करणारे, पण तितकेच रंगभूमीकरिता मनापासून मेहनत करणारे अनेक कलावंत असल्याचे आपणास दिसून येतात. त्याच प्रमाणे व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा अनेक सुंदर प्रयोग होताना आपणास दिसून येतात. या सर्वांवर नाट्यगृहात जावून, नाटक बघून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवून, प्रेम करणे गरजेचे आहे. असे यावेळी अवचिन्ह नाटकातील उपस्थित कलाकार यांनी मत व्यक्त केले.

तेव्हा येताय ना, 16 मार्च 2025, शिवाजी नाट्य मंदिर, दादर…

तेव्हा आमच्या टीम कडूनही आपणास आवाहन करण्यात येते कि अस्सल मनोरंजन करून घेण्याकरिता नाटकाला उपस्थित रहा. नक्कीच काही काळ का होईना तुम्हाला बाहेरचे रोजचे टेन्शन विसरायला लावायला सज्ज आहे टीम “अवचिन्ह”.

प्रयोगासाठी संपर्क 

श्री. निलेश रमेश जाधव 7021155453

श्री. नितीन म्हापसेकर – 9769875534

Scan QR Code to Contact for Ticket

कलाकार – निलेश रमेश जाधव, नीलमाधव कल्याण, गणेश राजेशिर्के, अनिकेत मोरे (गुड्डू), मयुरा निलेश जाधव, रेणुका इंगळे, डॉ. प्रदिप स. निंदेकर, नितीन सदानंद म्हापसेकर, अमेय हळदे, अविनाश शेवाळे, विवेक शिंदे, योगेश पाटील, विनायक निवळकर.

कलाकार गणेश राजेशिर्के यांना अवचिन्ह या नाटकाकरिता मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रशांत निगडे सर आणि मराठी अभिनेत्री विरीषा निगडे यांच्या उपस्थितीत पारितोषिक मिळाले

 

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Trending बातम्या

No posts found.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *