Bhiwandi – भिवंडी शहरातील न्यू आझाद नगर परिसरात महापालिकेचे शौचालयगृह असूनही ते जीर्ण अवस्थेत आहे. शौचालयाचा पहिला मजला गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे असहाय्य महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
भिवंडीतील न्यू आझाद नगर येथील रहिवासी असलेल्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे, १२ वर्षांपूर्वी भिवंडी प्रशासनाने मनपा शाळा क्रमांक १०४ शेजारी ३० आसनक्षमतेचे एकमजली शौचालय बांधले होते. त्यातील १५ जागा महिलांसाठी तर १५ जागा पुरुषांकरिता राखीव आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शौचालयगृहाला नशाखोरांनी आपला अड्डा बनवला आहे.
आणि मोबाइल घेताच लागली आग… संपूर्ण माहिती वाचण्याकरिता क्लिक करा
त्यामुळे शौचास जाणाऱ्या महिला व मुलींसोबत व्यसनाधीन विनयभंग व गैरवर्तन करतात. या कारणांमुळे असहाय्य महिलांना भीतीपोटी उघड्यावर शौचविधी उरकावा लागतो. अनेकदा तक्रार करूनही प्रशासन महिलांच्या सुरक्षेबाबत उदासीन आहे. त्यामुळे स्थानिक महिलांनी मदतीसाठी भिवंडी शहर महिला अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्याकडे दाद मागितली आहे.
स्वाती कांबळे यांनी सांगितले की, स्वच्छतागृहाच्या सर्व खिडक्या व दरवाजे तुटले आहेत. गर्दुल्ले, नशेखोर मद्यधुंद अवस्थेत महिलांची छेड काढतात. नाईलाजास्तव भीतीपोटी महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. या संदर्भात आयुक्त म्हसाळ यांनी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
Trending
Pingback: या' कारणाने ग्रामस्थ हवालदिल - marathistatus.co