marathistatus.co

या’ कारणाने ग्रामस्थ हवालदिल

 

   

ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या समर्थक पॅनलचा पराभव झाल्याच्या रागातून चक्क एका गावात पाणीपुरवठ्यासाठी पाईप लाईन टाकण्यास विरोध केला जात असल्याने गावातील इतर ठिकाणी असलेल्या बोअरवेलवरुन पाणी आणण्याची नामुष्की ग्रामस्थांवर आली आहे. भिवंडी तालुक्यातील चाणे ग्रामपंचायत हद्दीतील हा प्रकार असून या अडवणूक विरोधात सरपंच उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांनी ठाणे तहसीलदार अधिक पाटील यांना निवेदन दिले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत चाणे हद्दीतील भोईर आळी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यमान ग्रामपंचायत सरपंच नितीन शिवराम जाधव व उपसरपंच प्रदीप बाळू कासकर यांनी पुढाकार घेवून १५ वित्त आयोगातून भोईर आळी येथे बोअरवेल खोदण्यात आली. त्यास मुबलक पाणी लागले. या बोअरवेल पासून लोकवस्तीचे अंतर सुमारे एक किलोमीटर पर्यंत आहे. बोअरवेल मध्ये विद्युत मोटर बसवुन पाईपलाईनद्वारे भोईर आळीत पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी पाईप लाईन टाकण्यास तेथील जमीन मालक अनंता सुदाम पाटील व त्यांचे भाऊ प्रकाश, देवेंद्र व सुनील यांनी आडकाठी केली आहे.

भिवंडीतील भयाण वास्तव उघडकीस – Bhiwandi News

त्यामुळे पाणी असून ही येथील २०० नागरिकांची लोकवस्ती असलेल्या भोईर आळी मध्ये पिण्याचे पाणी नळावाटे मिळू शकत नाही. यासाठी सरपंच नितीन शिवराम जाधव व उपसरपंच प्रदीप बाळू कासकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तहसीलदार यांची भेट घेवून याबाबत मार्ग काढण्याची मागणी केली आहे. याबाबत स्थानिक मंडळ अधिकारी यांना जागेवरील वस्तुस्थितीदर्शक अहवात तात्काळ मागवून घेवून योग्य ती कारवाई करून आदेश देण्यात येथील असे आश्वासन तहसीलदार अधिक पाटील यांनी दिले.

दर्जेदार मराठी स्टेटस

बोअरवेलच्या चारही बाजुस चाणे गावाचे रहिवासी अनंता सुदाम पाटील, प्रकाश सुदाम पाटील, देवेंद्र सुदाम पाटील, सुनिल सुदाम पाटील यांचे मालकी हक्काचे जमिनीतून पाईपलाईन साठी शासकिय नियमानुसार ३ फुट खोल खोदकाम करण्यास अडथळा व मनाई करत असल्याने ग्रामविकासाच्या शासनाच्या कामात अडथळा निर्माण करत आहे अशी तक्रार सरपंच नितीन शिवराम जाधव यांनी केली आहे तर या पूर्वी पाच वर्ष सत्ता असताना त्यांच्या बोअरवेल वरुन पाणी दिले. आता सत्ता गेल्याने त्यांनी आमचे पाणी अडवले असल्याची तक्रार तेथील महिलांनी केली आहे.

Join Us on Facebook

Trending

No posts found.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *