marathistatus.co

पुष्पा 2 चा धुमाकूळ – प्रेक्षकांना का आवडला ? खर्च, कमाई, टीम… झुकेगा नाही साला.

Pushpa 2 – Pushpa the Rule

पुष्पा 2: द रुल हा 2024 चा भारतीय तेलुगु-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. जो सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि सुकुमार रायटिंग्जच्या संयुक्त विद्यमाने Mythri Movie Makers द्वारे निर्मित आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगपती बाबू, धनंजया, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्यासोबत अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहेत. पुष्पा चित्रपट मालिकेतील हा दुसरा भाग आहे आणि 2021 मध्ये आलेल्या पुष्पा: द राइज चित्रपटाचा सिक्वेल आहे. मूळ चित्रपटाच्या डिसेंबर 2021 मध्ये रिलीज होण्याच्या काही दिवस आधी, पुष्पा 2 अंतर्गत सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली होती, तर पुष्पा 2: द रुल हे उपशीर्षक ऑगस्ट 2022 मध्ये घोषित करण्यात आले होते. चित्रपटाचे 10% फुटेज सुरुवातीला मूळ चित्रपटासोबत मागे-पुढे शूट करण्यात आले होते. तथापि, सुकुमारने कथेत बदल करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे चित्रपटाची मुख्य छायाचित्रण ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झाली. चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे, छायांकन मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी केले आहे आणि संपादन नवीन नूली यांनी केले आहे. ₹400–500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला,हा चित्रपट सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. 200 मिनिटांच्या रनटाइमसह, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय चित्रपट आहे.

ट्रॅकिंग वेबसाइट Sacnilk नुसार, पुष्पा 2 ने 8 डिसेंबर रोजी भारतात 141.5 कोटी रुपयांची कमाई केली. हिंदी आवृत्तीने 85 कोटी रुपयांची कमाई केली, तर तेलुगू आवृत्तीने भारतात 44 कोटी रुपयांची कमाई केली. तामिळनाडूमध्ये रविवारी पुष्पा 2 ने 9.5 कोटी रुपयांची कमाई केली.

मल्याळम आणि कन्नड आवृत्तींनी 8 डिसेंबर रोजी भारतात अनुक्रमे 1.9 कोटी आणि 1.1 कोटी रुपयांची कमाई केली. पुष्पा 2 चे चार दिवसांचे कलेक्शन आता 529.45 कोटी रुपये झाले असून हिंदी आवृत्तीचे मोठे योगदान आहे. एकूण, हिंदी आवृत्तीने चार दिवसांत 285.7 कोटी रुपयांची कमाई केली.

पुष्पा सारखे सिनेमे पाहिल्यावर.. टॉलीवूड सिनेसृष्टी समोर.. हल्लीची बॉलीवूड सिनेसृष्टी अगदी पाणी कम चाय वाटते..

जुन्या सुपर, डुपर हिंदी सिनेमांचा विषय यात येत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

साऊथच्या लोकांना जसं समजलं, की उर्वरित भारतात.. आपले सिनेमे डब करून ही मंडळी करोडो रुपये कमवत आहेत. तेंव्हापासून.. त्यांनीच आपले सिनेमे सुरवातीलाच हिंदीत डब करून भारतभर प्रसारीत करायचा धडाका लावला,

पुष्पा पार्ट टू.. सिनेमाची सुरुवात एकदम जबरदस्त आहे, अल्लू अर्जुनची एन्ट्री असली खतरनाक दाखवली आहे, की.. सुरुवातीलाच आपला पैसा वसूल होतो. आल्लु अर्जुनने सिनेमात परिधान केलेले झगझगीत शर्ट्स मला विशेष आवडले, तुम्हालाही नक्कीच आवडतील.

सिनेमातील अल्लु अर्जुनचा अभिनय, आणि सिनेमाच्या हिंदी डबिंग करिता मराठमोळ्या श्रेयस तळपदेने त्याला दिलेला हिंदी भाषेतील आवाज, आणि हा आवाज देत असताना मधेमधे त्याने दिलेला मराठी भाषेचा कडकडीत तडका, हा संगम अगदी अफलातून झाला आहे.

दाक्षिणात्य सिनेमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे.. एक खांदा वर आणि मान किंचित वाकडी असणारं काहीसं दिव्यांग पात्र, सिनेमातील प्रमुख भूमिकेत दाखवण्याची डेरिंग बॉलिवूड मधील निर्मात्यांनी केली असती का.?

किंवा.. अशी अफलातून कल्पना त्यांच्या सुपीक मेंदूत साकारली असती का.?

हा.. शंभर टक्के विचार करण्याचा भाग आहे, आणि हे सगळं साकारून.. दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी सिनेमा क्षेत्रात फार मोठा तिर मारून, आपला एक वेगळाच ठसा भारतीय सिनेसृष्टीवर उमटवला आहे, असं म्हंटल्यास त्यात अतिशयोक्ती नसावी.

सिनेमातील मारधाड ही शंभर टक्के नकली असली तरी, त्याचं सादरीकरण असलं भन्नाट असतं, की सिनेमा पाहताना नकळतपणे आपण देखील त्या सिनेमाचा हिस्सा होऊन जातो, अक्षरशः आपल्या अंगात सिनेमा संचारतो.

सिनेमात अगदी साधेपणाने सादर केलेलं गावठी नृत्य आपल्या डोळ्याचं पारणं फेडतं, तर.. नात्यातील भावनिक गुंतागुंत पाहून काहीवेळा आपले डोळे पाणावतात.

सिनेमाचं कथानक अगदी साधं सोपं आहे, एक कुटुंबवत्सल नायक आणि त्याच्या सहचारिणी सोबत त्याचं सगळं कुटुंब, मित्रमंडळी, राजकारण, आणि मुख्य विषय..चंदन तस्करीच्या अवतीभवती सिनेमाचं सगळं कथानक फिरत असतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सिनेमातून दिसून येणाऱ्या हिंदू संस्कृतीचा बाज आणि दाक्षिणात्य ग्रामीण भागातील धार्मिक चालीरीती, उत्सव पाहताना प्रेक्षक आपलं देहभान हरपून जातात.

सिनेमात इतर कोणत्याही जातीपातीच्या विषयांना किंवा कोणत्याही प्रकारच्या वादांना छेद देत, फक्त आणि फक्त दाक्षिणात्य हिंदू संस्कृती मधील पूजापाठ आणि त्यासंबंधी इतर विषयांचा उदोउदो चित्रित करत असताना, ही लोकं बिलकुल मागेपुढे पाहात नाहीत. आणि नेमका हाच विषय प्रेक्षकांच्या काळजाला हात घालुन जातो.

सिनेमाच्या दुसऱ्या भागात सुद्धा रक्तचंदन तस्करीचा विषय आणि त्यातून निर्माण होणारा चोर, पोलीस, राजकारण असा संघर्ष एकदम चपखल मांडण्यात आला आहे. प्रत्येक वेळी पोलिसांना चायलेंज करून त्यांच्या नजरे समोर केली जाणारी चंदन तस्करी, सक्सेस होण्याकरिता.. विविध प्रकारच्या क्लुप्त्या पाहताना प्रेक्षकांना अगदी खूळ लागण्याची वेळ येते. ही तस्करी कल्पना म्हणजे अगदी आपल्या डोक्या बाहेरचा कार्यक्रम असतो.

सिनेमातील सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त अभिनय साकारला आहे. त्यामुळे सिनेमाला अक्षरशः चार चांद लागले आहेत.

सुकुमारचे दिग्दर्शन अगदी उच्च दर्जाचे आहे, कथानक साधं सोपं असलं तरी ते अतिशय आकर्षक आहे, संवाद प्रभावी आहेत, सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्शन कोरिओग्राफी नेत्रदीपक आहे, चित्रपटाचा साउंडट्रॅक अतिशय जबरदस्त आहे.

सिनेमाची स्टोरी किंवा डायलॉग मी बिलकुल एक्स्पोज करणार नाहीये, नाहीतर तुमचा सगळा रसभंग होईल.

जबरदस्त सिनेमा आहे, आणि सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे, हे अगोदरच सांगून टाकतो.

जमल्यास.. पहिला भाग ott वर पाहून हा सिनेमा पाहायला जावा, म्हणजे डोक्याला जास्ती ताण द्यावा लागणार नाही, आणि.. सिनेमाचा मनमुराद आनंद तुम्हाला लुटता येईल.!!

Check up the day-wise breakup of Pushpa 2 in India (nett):

  • Day 0: Rs 10.65 crore (from the premier shows)
  • Day 1: Rs 164. 25 crore
  • Day 2: Rs 93.8 crore
  • Day 3: Rs 119. 25 crore
  • Day 4: Rs 141.5 crore
  • Total: Rs 529.45 crore

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *