marathistatus.co

बाप रे……. मुलीच्या कानात साप. अंगावर शहारे आणणारा विडीओ बघा. Snake in Girls Ear

साप…..  नाव जरी एकलं तरी मनात भिती वाटते, हृदयाची धडधड वाढते…..

Snake in Girls Ear
जगात डायनासोर सारखा महाकाय प्राणी जरी अस्तित्वात होता, सध्या पृथ्वीवर वाघ, सिंह, अस्वल, हत्ती, गेंडा असे जरी हिंस्त्र प्राणी असले तरी संपूर्ण जगात सर्वात जास्त ज्या प्राण्याची भिती वाटते, तो प्राणी म्हणजे “साप”.

रस्त्याने चालत असताना अचानक पुढे साप दिसला… दिसला सोडा, पण ध्यानी मनी नसताना अचानक कुणी जोरात “साप SSSS…..” असं जरी ओरडलं तर दचकून घाम फुटायला होतं. असा छोटा असो की मोठा साप जरी जवळ दिसला, अंगावर पडला, सापावर पाय पडणार असला तर हा भयानक क्षण ती व्यक्ती जन्मभर विसरु शकत नाही. तो आठवणीतून कधीही Delete न होणारा प्रसंग मनाच्या / बुध्दिच्या एका कप्प्यात Store असतो. आणि जेव्हा जेव्हा मित्र मैत्रींनींमध्ये. परीवारात चर्चा रंगते तेव्हा तो प्रसंग आठवून आपण चवीने तो सांगत असतो.

असा हा छोटा असो वा मोठा पण कमालीची भिती वाटणारा प्राणी म्हणजे साप तुमच्या कपड्यात गेला तर तुम्हाला साप कपड्यातआहे हे माहित झाल्यापासून तो बाहेर काढण्यापर्यंतचा कालावधी म्हणजे प्रचंड घाबरवणारा आणि भयंकर संयमाचा असतो.

पण साप जर चक्क तुमच्या कानात घुसला तर….. साप कानाच्या आतमध्ये असून फक्त त्याचं तोंडच दिसत असलं तर….

होय अशी घटना एका मुली सोबत घडली आहे. सध्या समाजमाध्यमांवर सदर प्रकरणाचा विडीओ प्रचंड वायरल होत आहे.

 

आपण विडीओ मध्ये बघू शकतो की एका वयस्कर मुलीच्या कानात साप असून फक्त त्याचे तोंड बाहेर दिसत आहे. त्या सापाचे संपूर्ण शरीर त्या मुलीच्या कानाच्या आतमध्ये आहे. आणि डाॕक्टर चिमट्याच्या सहाय्याने त्या सापाचे तोंड किंवा जबडा पकडून साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा डाॕक्टर चिमट्याने सापाचे तोंड पकडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तेव्हा साप जबडा ऊघडून चिमट्याला चावण्याचा प्रयत्न करतो.

 

पण काही केल्या सापाचे तोंड चिमट्यात सापडत नसल्याचे दिसून येते. पण या दिड मिनीटाच्या विडीओत डाॕक्टर शर्तीचे प्रयात्न करत असून सुध्दा तो साप बाहेर काढल्याचे दिसून येत नाही. हा विडीओ कुठला आहे याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पण विडीओ नक्कीच बाहेर देशातला आहे हे विडीओ बघून नक्कीच दिसून येते.

कानात साप आहे हे माहिती पडल्यापासून ते कानातून साप काढण्यापर्यंत त्या मुलीची काय अवस्था झाली असेल ? याक्षणी आपल्यासोबत असे घडले तर आपल्याला काय वाटेल ? हा विचार करुनच भिती वाटते. विडीओत जरी साप कानाच्या बाहेर काढल्याचे
दिसून येत नाही पण आशा करुयात की त्या मुलीच्या कानातून साप बाहेर काढण्यात डाॕक्टरांना यश मिळालं असेल आणि मुलगी पण सुखरुप असेल.

विडीओ बघा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *