marathistatus.co

भल्यामोठ्या नागाच्या फण्यावर पडला असता पाय, नागाने घेतला असता चावा, आईने वाचविले प्राण. एकदा विडीओ बघाच.

Viral Snake Video

असे बोलल्या जाते की, मुलाच्या रक्षणाकरिता देव क्षणोक्षणी हजर राहू शकत नाही म्हणून देवाने “आई” बनवली.

याचीच प्रचीती आणणारे CCTV फुटेज  समाजमाध्यमांवर पहावयास मिळतो.

आपण विडीओ मध्ये बघू शकतो कि एका घराच्या दाराबाहेर रुंद अश्या सिमेंटच्या दोन पायऱ्या आहेत. आणि त्याला लागुनच एक भलामोठा नाग येत आहे. त्याच वेळी घरातून एक आई आणि तिचा मुलगा बाहेर येतात. नाग पायरीला लागून येत असल्यामुळे तो एकाएक दृष्टीस पडत  नाही. महिला मुलाला घेवून येते त्यावेळेस महिलेचे लक्ष दुसरीकडे असून तीने मुलाला पुढे केले. महिलेच्या पायात चप्पल नाहीत आणि मुलगा तयारी करून आणि पिवळ्या रंगाचे बूट घालून असल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ मुलाला कुठेतरी बाहेर पाठवायचे आहे. त्याला घ्यायला येणाऱ्याची महिला वाट बघत आहे.

ज्यावेळेस मुलगा  पायरीवरून पाय खाली ठेवतो नेमके त्याच वेळेस नागाचे तोंड पायाखालीच येणार असते. पण नागाला माणसाची चाहूल लागल्यामुळे तो लगेच चपळतेने मागे फिरतो.  आणि मुलगा चार पावले पुढे चालला. नाग मागे फिराल्याक्षणी महिलेला तिथे साप असल्याचे दिसून आले आणि घाबरून ती वरच थांबली. कदाचित ती सापाला बघून घाबरली असावी आणि त्यामुळे ती ओरडली असावी. तिचे ओरडणे ऐकून मुलगा भांबावून किंवा काय करावे हे न सुचल्यामुळे परत नागाकडे जोरात पळून नागाच्या एकदम जवळ गेला. कदाचीत तो नागाच्या अंगावरच पडला असता. आणि मुलाला बघून नाग फना काढून जवळपास दोन ते तीन फुट हवेत वर उभा राहिला. आणि मुलाकडे वळून मुलाला चावा घेण्याचा प्रयत्न केला.

पण हे बघून प्रसंगावधान राखून महिलेने एकदम चपळतेने धावत जावून मुलाचा हात पकडून ओढून घेतले. लगेच नागापासून मुलाला दूर केले आणि मुलाला उचलून घेतले. आणि मुलाचे प्राण वाचालीले. त्यानंतर नाग पुढे निगुन गेल्याचे दुसून येते. 

काही दिवासाअगोदर असाच एक विडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एका लहान मुलीला तिच्याच घराबाहेर असलेल्या छोट्याश्या लाकडी कपाटातून चपला काढत असताना एका सापाने तिचा चावा घेतला. पण या प्रकरणात दुर्दैवाने त्या मुलेचे प्राण वाचू शकले नाही असे समजते. त्याचप्रकारे हि घटना सुद्धा घडली असती. पण सुदैवाने यात कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. 

असेच विविध विडीओ बघण्याकरिता नियमित भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *