भूतकाळाला विसरून, उज्वल भविष्य घडविण्यासाठी , वर्तमानाचे भान ठेवून …
समाज, कुटुंब, जोडीदार यांना प्राथमिकता देवून मनाला आवर घालत रहा…
योग्य, तणावमुक्त जीवनासाठी तरी
तू ठाम रहा…..
फक्त आपण सोबत घालवलेल्या क्षणांची
तू शेवटर्यंत साक्षी रहा
पण… माझं मन कितीही भरकटलं तरी….
तू ठाम रहा…..
मला असं वाटतंय
सुंदर असे घालवलेले दिवस
कधी संपूच नये असं तुलाही वाटायचं
फक्त एकदा तू मागे वळून पहा….
फक्त एकदा तू मागे वळून पहा….
पण… माझं मन कितीही भरकटलं तरी…..
तू ठाम रहा….
नशिबाने झालो दूर….
नाही होऊ शकलो एक तरी
तुझ्या संसारात,
तू खुश रहा….
तू खुश रहा….
पण मध्येच, माझं मन कितीही भरकटलं तरी…..
तू ठाम रहा….
कधीही शक्य नसले,
तरी वाटते आपण भेटूयात…
जीवनाच्या अनपेक्षित वळनावर
असा दिवस उजळावा…
त्याकरिता कदाचित मी फोनही करील
त्याकरिता… कदाचित मी फोनही करील
पण मात्र… माझं मन कितीही भरकटलं तरी…..
तू ठाम रहा….
मला आलीच तुझी आठवण खूप
वाटलं, मन राहवतच नाही तुझ्याशिवाय
मी विचारलं तुला, आपण भेटायचं का ?
जमत असेल तर plz पहा
तेव्हा तु सांग,
अरे निदान आपलं Marital Status तरी पहा.. 😇
जरीही माझं मन कितीही भरकटलं तरी…..
तु ठाम रहा
नेहमीच तु सांगून वास्ताविकता
लगेच भानावर आण मला
आणि समजावून सांग मला, “हे आता शक्य नाही”
तुझ्या मनाला फटकारून तू सांग
“ये मना जरा सांभाळून रहा….”
“ये मना जरा सांभाळून रहा….”
कधी माझं मन कितीही भरकटलं तरी…..
तु ठाम रहा
आपण सोबत घालवलेले क्षण…
समजून घेतलेलं एकमेकांचे मन…
शरीराच्या पलीकडे जाऊन
मनाशी मनाशी जुडलेलं नातं…
असंच निरंतर मनाच्या कप्प्यात
जपून रहावं, याकरिता
कुठल्याही अवांतर अपेक्षा न ठेवता
निदान संपर्कात तरी रहा….. 🙂
पण..चुकीने माझं मन कितीही भरकटलं तरी…..
तु ठाम रहा
संसार, जोडीदार, मुले यांना सांभाळताना
आई-वडिलाने, समाजाने दिलेले कर्तव्य सांभाळताना
नसेल होत संपर्कात राहणे,
तर माझी काही हरकत नाही
तु मला फक्त आठवणीत ठेव
आणि तूही फक्त आठवणीत रहा…
आणि तूही फक्त आठवणीत रहा…
पण…माझं मन कितीही भरकटलं तरी….
तू ठाम रहा….
मी कितीही प्रयत्न केला तरी,
कधीच नाही विसरु शकत तुला…
तुझ्या आठवणीच्या पटलावरून
पुसून टाकलंस का मला ?
जरा एकदा आपल्या मनाला विचारून पहा
जरी नसशील माझ्या आठवणी पुसल्या तरी….
जरी नसशील माझ्या आठवणी पुसल्या तरी….
कधी चुकीनं… माझं मन कितीही भरकटलं तरी…..
तु मात्र ठाम रहा…..
तु मात्र ठाम रहा…..
तु मात्र ठाम रहा…..
डॉ. प्रदिप स. निंदेकर
9326030860समुपदेशक, मनसंवाद
कविता नावासोबत शेयर करण्यास हरकत नाही.
सार्वावजनिक ठिकाणी किंवा समाज माध्यमांवर वाचन करण्याअगोदर परवानगी घेणे आवश्यक