marathistatus.co

Marathi Jokes मराठी भन्नाट विनोद

दिवसातून एकदातरी हसा.. आणि आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवा. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर थोडा वेळ निवांत व्हा, टेन्शन, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.

 

 

विनोद ०१

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?

मुलगी: एम. जी. रोड

झम्प्या: एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०२

आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?
गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,
आई: कोणता?
गंपू: माँ की ममता.
आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,
गंपू: कोणता?
आई: बाप का कहर.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०३

खतरनाक प्रपोज

मुलाने मुलीला मारलेला सगळ्यात खतरनाक Propose.. .

.
.
” तुझं नाव आमच्या Ration Card ला लावायचं आहे ”

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०४

नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात
एक सुंदर मुलगी आली होती.
बायको: एकटीच आली असेल?
नवरा: हो तुला कसं माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद०५

बंड्या: अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
पक्या: काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या: काय सांगतोस काय!
पक्या: मग काय… सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद… दारू-सोडा, दारू-सोडा.

मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०६

जर तुम्हाला वाटतंय की तुमचे आई, वडील, शिक्षक, मालक
किंवा BOSS वगेरे खूप कडक आहेत, किंवा तुम्हाला खूप त्रास देतात…

.
.
तर थांबा तुमच लग्न होऊन बायकोला येउद्यात…
तुम्हाला हे सगळी मंडळी प्रचंड आवडतील..!!

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०७

लहान मुलगा : आज्जी नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद सावकाश पळ रे बाबा !

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०८

पक्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो,
पक्या : तुला आई ओरडत नाही का ?
मुलगी: हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

आणखी नवनवीन विनोद बघा

1 thought on “Marathi Jokes मराठी भन्नाट विनोद”

  1. Pingback: All Best Marathi Jokes - marathistatus.co

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *