marathistatus.co

Marathi Jokes मराठी भन्नाट विनोद

हसणे म्हणजेच अनेक आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवणे. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर पाच मिनिट निवांत व्हा आणि, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.

 

विनोद ०१

आई छोट्या पक्याला :- पक्या लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!
पक्या :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

विनोद ०२

डॉक्टर – घाबरू नका जोशी… खूप छोटं ऑपरेशन आहे. 

पेशंट – थॅंक यु डॉक्टर, पण माझं नाव जोशी नाही.

डॉक्टर – माहीत आहे… जोशी माझं नाव आहे

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०३

शिक्षक – चला मुलांनो आज तुमच्या सामान्य ज्ञानाची परीक्षा आहे. एखाद्या वैज्ञानिकाचे नाव सांगा बघू…

पक्या – आलिया भट

शिक्षक – मुर्ख मुला, चल वर्गाबाहेर हो.

चम्प्या – मॅडम, चिडू नका तो बोबडा आहे. त्याला आर्य भट्ट असं म्हणायचंय. 

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०४

नवीन नवरी सासरी गेल्यावर सासूसासऱ्यांच्या पाया पडते

सासू – सुखी राहा

सून – तुम्ही राहू देणार का ?

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद०५

एक फुकटचा सल्ला…
हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे
पैसे वाचवू शकेन..
.

.
.
.
फक्त तिला म्हणा कि….
.
.
.
बोल जाडे , आज काय खाणार …..?

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०६

महागाई स्पेशल

आयुष्याच्या वाटेवर खूप चढउतार येतील,

तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की…….

उतार आला की,

गाडी बंद करायची कारण पेट्रोल ने शंभरी कधीच पार केली आहे.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०७

कंजुस बापाला त्याचा मोठा मुलगा बोलतो:
“पप्पा माझी गर्लफ्रेँड प्रेगनेंट झाली आहे.  ती कुणालाही काहीच न सांगण्यासाठी ५०,००० रुपये मांगत आहे.”

कंजुस बाप काहीच न बोलता पैसे देऊन देतो.

दोन महिन्यानंतर
त्याचा लहान
मुलगा बोलतो: “पप्पा माझी गर्लफ्रेँड प्रेगनेंट झाली आहे.  ती कुणालाही काहीच न सांगण्यासाठी ५०,००० रुपये मांगत आहे.” कंजुस काहीच न बोलता पैसे देऊन देतो.
.
६ महिन्यानंतर…..
कंजुसची कुँवारी मुलगी बोलते: “डॅडी, मी प्रेगनेंट आहे.!”
.
कंजुस तिला मिठी मारतो आणि तिच्या कपाळाला चुँबन
देवून बोलतो : “शाबाश मुली, आता पैसे घ्यायची माझी वेळ आली आहे…..

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०८

सर्व मुलांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका
आत्ताच एका Activa च्या मागे आमचा पक्या

पेट्रोल चा विचार न करता
उगाचच ०५ किलोमीटर जाऊन आला !

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०९

पिंकी : माझे हृदय म्हणजे माझा
मोबाईल आहे आणि तू त्यातले
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..
पक्या : राणी एक विचारू ?
पिंकी : हो विचार ना..
पक्या : मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद १०

बाबा पक्याला : पक्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
पक्या : तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *