marathistatus.co

काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव Marathi Life Status

Best Attitude Status in Marathi सर्वोत्तम एटीट्युड स्टेटस

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात Marathi Life Status
आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण देऊन जाते.

 

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं, पण प्रत्येक दिवस आनंदाने जगतं Marathi Happiness Status
आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा प्रत्येक क्षण किती आनंदाने जगतो, हे महत्त्वाचं आहे.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल Marathi Motivational Status
यश आणि प्रसिद्धी वाढत गेली की कौतुकासोबत मत्सर करणारेही वाढतात.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच इतरांना हसवू शकतो Marathi Life Status
ज्याने दुःख जवळून अनुभवलंय, त्यालाच दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू जपण्याची किंमत कळते.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही Marathi Motivational Status
नकारात्मक विचारांना मनात प्रवेश न दिल्यास कोणतीही परिस्थिती आपल्याला हरवू शकत नाही.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही

जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार

तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव Marathi Inspirational Status

Attitude मराठी स्टेटस

सर्व पहा →
कधी कधी अपयशातून मिळालेला अनुभवच आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण ठरतो.

काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.

 

दगडाने डोकेही फुटतात पण त्याच दगडाची मूर्ती बनवली तर लोक डोकं टेकतात Marathi Life Status
माणसाची किंमत त्याच्या परिस्थितीने नाही, तर त्याला मिळालेल्या घडणीने ठरते.

दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.

एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर विश्वासाला पात्र नव्हता Marathi Life Status
कोणाचा विश्वास जिंकण्यापेक्षा तो विश्वास टिकवणे अधिक महत्त्वाचे असते.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर,
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

 

जवळच्या माणसाचा स्वभाव आणि कठीण परिस्थितीत त्याचे वागणे Marathi Life Status
माणसाची खरी ओळख त्याच्या परिस्थितीतील वागण्यातूनच होते.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

 

आपले दुःख मोजक्या माणसांजवळ व्यक्त करा Marathi Life Status
आपल्या दुःखाची किंमत समजणारी माणसं आयुष्यात मोजकीच असतात.

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा,
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते,
आणि ४९ टक्के लोकांना,
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

आयुष्यात काय कमावले यावर कधी गर्व करू नका Marathi Life Status
यश, पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा शेवटी माणूस म्हणून जगणे अधिक महत्त्वाचे असते.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

सर्व पहा →

मराठी चारोळ्या

सर्व पहा →

Latest मराठी विनोद

सर्व पहा →

टोमणे मराठी स्टेटस

सर्व पहा →

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

📲 रोज दर्जेदार मराठी स्टेटस करिता App ⬇️ करा