marathistatus.co

Marathi Jokes मराठी भन्नाट विनोद

दिवसातून एकदातरी हसा.. आणि आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवा. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर थोडा वेळ निवांत व्हा, टेन्शन, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.

 

 

विनोद ०१

बायको : अहो ऐकलंत का, बर्‍याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..

लागला ना डोक्याला शॉट,

वाचा नीट परत एकदा.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

 

विनोद ०२

खोटं बोलायला पण काही लिमिट असते….
काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..”

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

 

विनोद ०३

पक्या बाबांना- बाबा एक ग्लास पाणी द्या न !

बाबा-उठून स्वतः घे

पक्या – बाबा प्लिज द्या न ..

बाबा- आता बदडूनच काढतो तुला.

पक्या – बाबा बदडायला येताना पाणी आणा.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

 

विनोद ०४

दोन मुके उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते.
.
.
मला त्यांची दया येणार तेवढ्यात,.
.
हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

 

विनोद०५

पक्या गंप्याला ला विचारतो

पक्या
: अरे यार गंप्या , हा sent message काय प्रकार आहे ?

गंप्या
: काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..

sent message म्हणजे perfume चा
message

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

 

विनोद ०६

बॉस : ऑफिसला का नाही आलास ? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

 

विनोद ०७

शाळेत बाई वर्गात मुलांना प्रश्न विचारत असतात.

शिक्षिका- एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, काय निवडाल.?

पांडू – बाई आम्ही पैसे निवडू.

शिक्षिका- चूक.आहे .मी तर अक्कल निवडली असती.

पांडू – हो, बरोबर आहे बाई,ज्याच्याकडे जे नसतं त्याने

तेच घ्यायच असतं

बाईंनी पांडूची चांगलीच अक्कल काढली !

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

 

विनोद ०८

सासू: “कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !”

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️