marathistatus.co

Marathi Jokes मराठी भन्नाट विनोद

दिवसातून एकदातरी हसा.. आणि आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवा. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर थोडा वेळ निवांत व्हा, टेन्शन, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.

 

 

विनोद ०१

जेव्हा एखादा मुलगा म्हणतो,
“या जगात प्रेमापेक्षा कठीण दुसरं काहीच नाही….”

त्याच्या तोंडावर गणिताचं पुस्तक फेकायचं आणि म्हणायचं,
“घे रताळ्या….जरा हा इंटिग्रेशनचा प्रश्न सोडवून दाखव बरं”

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०२

काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस
My dad is my real hero
मग आमच म्हातार काय
नीळू फुले आहे का.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०३

मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं

मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०४

एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो,
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात,
डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे,
तुम्ही फार लकी आहात,
स्त्री: कसली लकी,
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून !

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद०५

सुरेश: नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां?
नरेश: हो, देईन ना.

सुरेश: समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां?
नरेश: हो. का नाही.

सुरेश: समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल?
नरेश: नाही.
सुरेश: का नाही ?
.
.
.
.
नरेश: माझ्याकडे खरच आहेत !!!

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०६

बायको :- अहो, तुमचा तो मित्र अतुल त्याचं ज्या मुली बरोबर लग्न ठरलय,

ती मुलगी चांगली नाही ती व तिच्या घरचे भांडखोर आहेत.

तिला काही घरकाम येत नाही. जर तिच्या बरोबर लग्न केल तर अतुलची वाट लागेल..!!

.

नवरा :- (गप्प)

.

बायको :- तुम्ही का काही बोलत नाही??🤔🤔

.

नवरा :- (गप्प)

.

बायको :- तुम्ही अतुलला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून..??

.

नवरा :- (गप्प)

.

बायको :- (चिडून) तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची..!!

जाऊन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून..!!

.

नवरा :- मी कोणाला काही सांगायला जाणार नाही…!!

.

बायको :- (चिडून) का ??

.

नवरा :- माझ्या वेळी कुणी आलं होतं का सांगायला ?? 😂😂😂😂😂😂😂😂😂

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०७

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको: काय आहे?
नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर,
बायको: हं धरली,
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही,
नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर !

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

विनोद ०८

सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे,
आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?
पक्या: सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायचं आहे.

🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

 

आणखी नवनवीन विनोद बघा