marathistatus.co

Marathi Jokes मराठी दर्जेदार भन्नाट विनोद

दिवसातून एकदातरी हसा.. आणि आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवा. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर थोडा वेळ निवांत व्हा, टेन्शन, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.

 

विनोद 1 

बायको:- तुला माझ्यात काय आवडतं?

नवरा:- बोलायची तुझी पद्धत!

बायको:- म्हणजे माझा आवाज नाही का?

नवरा:- नाही गं, मी फक्त “पद्धत” म्हटलंय, आवाजाबद्दल तर डॉक्टरनी सांगितलंय —

कानात कापसाचा बोळा ठेवत जा म्हणून ! 😆

 

 

विनोद 2 

गुरूजी :- एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
    तर तीन बायका एका तासांत
    किती पोळ्या बनवतील ?

बंड्या :- एकही नाही.
    कारण, ती एकटी आहे म्हणूनच  तर काम करते.
    तिघीजणी  मिळून फक्त गप्पा मारतील.

 

 

विनोद 3 

विद्यार्थी : सर, मला अभ्यास लक्षात राहत नाही.

शिक्षक : का?

विद्यार्थी : कारण मोबाईलमध्ये मेमरी जास्त आहे, आणि माझ्या डोक्यात कमी!

 

 

विनोद 4

बायको:- आज माझा मूड खराब आहे! 

नवरा:- हाय रे देवाचा आशीर्वाद, आज शांतता दिवस! 😇 

 

आजचे दर्जेदार मराठी स्टेटस बघण्याकरिता – क्लिक करा

 

विनोद 5 

शब्दाने शब्द वाढतो
व शाब्दिक वाद निर्माण होतात
शब्द मनावर खुप वाईट परिणाम करतात,
म्हणून शक्यतो
मारामारी करूनच प्रकरण मिटवावे..!

एका बाईला १० मुलं असतात.
पत्रकार :- अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?
बाई :- मुन्नू.
पत्रकार :- बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?
बाई :- मुन्नू.
पत्रकार :- बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?
बाई :- सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार :- अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?
बाई :- अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना…

 

 

विनोद 6

मुलगा:- चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे

मुलगी:- आणि दुपारी?

मुलगा:- १ ते ४ आराम

मी पुण्याचा आहे ना!

 

 

 

विनोद 7

एक विवाहीत स्त्री स्वत:-च्याच

जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा

लावत होती तेवढ्यात.

नवरा :- अगं हे काय करतेस?

बायको :- अहो दसरा आहे ना आज !

म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.

 

 

विनोद 8

नवरा:- अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?

बायको:- डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.

नवरा:- काय? वेडबीड लागलंय का तुला?

असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.

बायको:- अहो, मी त्यांचं death certificate माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.

नवरा:- मग ? काय होतं त्यात ??

बायको:- त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, “Death due to High Pulse Rate”. डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.

नवरा सध्या कोम्यात आहे म्हणे !

 

 

विनोद 9

आई :- बाळ तू खूप मोठा हो…

बाळ :- आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.

आई :- बाळ इतका मोठा नको होऊ

कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.

 

 

विनोद 10

एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो .
तो तिन्ही ग्लास मधून थोडी थोडी बीयर पीत रहातो…

बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो…

तो माणूस सांगतो…
आम्ही तिन जिवलग मित्र आहोत. सध्या वेगवेगळया जागी रहात आहोत. सोबत पिण्याची आठवण म्हणून आम्ही तिघेही असेच पितो..

असे बरेच वर्ष चालते.

एक दिवस तो माणूस दोन बीयरचे ग्लास  मागवतो…

बार मालकाला शंका येते की एखादा मित्र वारला की काय ?

तो त्या माणसाचे सांत्वन करु लागतो.
त्यावर तो माणूस म्हणतो…

” अरे तसे काही नाही…. दोघेही ठणठणीत आहेत… “

बार मालक :- मग आज दोनच ग्लास  का ?

माणूस :- मी आजपासून पिणे सोडले आहे..अशी मैत्री असावी