अवचिन्ह (Avachinha)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र शासन मार्फत महाराष्ट्रातील कामगारांकरिता अनेक कल्याणकारी उपक्रम राबवत असते. त्यानुषंगाने कामगारांच्या कलागुणांना वाव मिळवा याकरिता दरवर्षी नाट्य महोत्सवाचे नियोजन केल्या जाते. त्याच पार्श्वभूमीवर विभागिय कार्यालय, मुंबई द्वारा ७० वा नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धा २०२४-२०२५ ही ०८ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रयोग सायंकाळी ७.०० वा. सुरु होत असून सदर स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर २, विक्रोळी (पूर्व) मुंबई याठिकाणी सुरु आहे.
याच स्पर्धेंतर्गत दिनांक ११/०१/२०२५ रोजी कामगार कल्याण केंद्र, जेकब सर्कल द्वारा “अवचीन्ह” या अतिशय सुंदर दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. सदर नाटक रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर आधारित असून लेखन आणि दिग्दर्शन निलेश रमेश जाधव यांनी केलेले आहे. नाटकात एकूण १३ पात्र असून प्रत्येक पात्राने आपली भूमिका अगदी चोख पार पडली. अतिशय गंभीरपणे सुरु झालेले नाटक अगदी काही सेकंदात विनोदाकडे वळून संपूर्ण अडीच तास विनोद, सस्पेन्स, थ्रील, प्रेम, द्वेष, सामाजिक दायित्व या आणि अशा अनेक विषयांना हात घालत अतिशय वेगाने पुढे सरकत गेले. पहिला अंक संपला तेव्हा प्रेक्षकांच्या मनात एक मोठा प्रश्न पडलेला होता… पण ब्रेक मध्ये फक्त तर्क लावण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीही नव्हते. त्या पडलेल्या प्रश्नाची उत्तर शोधण्याकरिता नक्कीच नाटक शेवटच्या क्षणापर्यंत बघावे लागले. पण कुठेही संथपणा येणार नाही किंवा बोअरिंग होणार नाही, याकडे दिग्दर्शकांनी विशेष लक्ष दिलेले आहे. आणि यात ते यशस्वीसुद्धा झाले.
कथानकातील प्रत्येक पात्राला वेगळी ओळख असून प्रत्येक पात्राची वेगळी छबी आहे. प्रत्येक पात्राचे कथेला पुढे नेण्याकरिता किंवा प्रेक्षकांना एक एक उलगडा होत जाण्याकरिता योगदान आहे. योग्य वेळी, योग्य प्रकारे त्यांची त्यांची एन्ट्री झाली, कि ते पात्र प्रेक्षकांना काहीतरी देवूनच गेले. येवढ्या १३ पात्रांचे लेखन ज्या ताकदीने केले त्याच ताकदीने ते प्रस्तुत सुद्धा करण्यात लेखक, दिग्दर्शक निलेश जाधव यांना तसेच कलाकारांना सुद्धा यश आले. कारण नाटक संपल्यानंतर स्टेज वर आलेल्या प्रेक्षकांना प्रत्येक कलाकाराचे नाटकातील नावे आठवणीत होती. हेच या नाटकाचे यश म्हणू.
सध्याच्या आधुनिक युगात अनेक सामाजिक प्रश्न नव्याने निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. त्यापैकीच एक प्रश्न हा या नाटकाचा मुळ गाभा असून शेवटपर्यंत त्याचा मागमूसही प्रेक्षकांना लागत नाही किंवा त्याची पुसटशी कल्पनाही प्रेक्षकांना येत नाही. पण नाटकाच्या शेवटी येवढ्या प्रखरपणे तो प्रश्न उभा राहिला, ज्याचा विचार करण्यास सर्वाना नक्कीच भाग पाडले. तो प्रश्न कोणता, त्याचे उत्तर काय आणि विशेष म्हणजे “अवचिन्ह” म्हणजे काय या सर्वांची उत्तरे एक सुज्ञ प्रेक्षक म्हणून येथेच देणे योग्य नाही. त्याकरिता भविष्यात जर हे नाटक इतर ठिकाणी प्रायोगिक किंवा व्यावसायिक रंगमंचावर बघण्याचा योग आला तर नक्कीच तुम्ही अस्सल विनोद, सस्पेन्स, थ्रिल यांचा अनुभव घेण्याकरिता हे नाटक बघाच…..
प्रवेश – विनामूल्य. पुढील नाटकांचे नाव आणि दिनांक बघा – क्लिक करा
या नाटकात विविध विभागात काम करणारे कलाकार असून या नाटकामागे ज्यांची ज्यांची मेहनत लागली त्या सर्वांविषयी माहिती जाणून घेवू.
लेखक, दिग्दर्शक | निलेश रमेश जाधव |
संगीत | अविनाश गव्हाणकर |
प्रकाश योजना | अक्षद मालेगावकर |
नेपथ्य | निलेश रमेश जाधव |
वेशभूषा | मयुरा निलेश जाधव |
प्रयोगासाठी संपर्क
श्री. निलेश रमेश जाधव 7021155453
श्री. नितीन म्हापसेकर – 9769875534
कलाकार |
निलेश रमेश जाधव – लेखक, दिग्दर्शक, कलाकार |
नीलमाधव कल्याण – कलाकार |
गणेश राजेशिर्के – घोडबंदर, ठाणे, Adani Electricity |
अनिकेत मोरे (गुड्डू) – मुंबई, कलाकार |
मयुरा निलेश जाधव – मुंबई |
रेणुका इंगळे – नेरूळ, महावितरण |
डॉ. प्रदिप स. निंदेकर – मुलुंड, मुंबई, महावितरण |
नितीन सदानंद म्हापसेकर – मुंबई, मुंबई उच्च न्यायालय. |
अमेय हळदे – मुंबई |
अविनाश शेवाळे – कोपरी, ठाणे, महावितरण |
विवेक शिंदे – विद्याविहार, मुंबई, Family Health Plan Insurance TPA Ltd |
योगेश पाटील – अलिबाग, महावितरण |
विनायक निवळकर – बेलापूर, नवी मुंबई, महावितरण |
कामगार कल्याण केंद्र, जेकब सर्कल |
निर्मिती प्रमुख |
समीर महादेव बांदिवडेकर (सहा. केंद्र संचालक) |
श्रीमती वंदना जाधव |
सहकार्य |
सौ. निर्मला परब |
विशेष आभार |
मा. श्री. संतोष साबळे (कामगार कल्याण अधिकारी) गट कार्यालय परळी |
मा. श्री. घनश्याम कुळमुथे (सहायक कल्याण आयुक्त) मुंबई विभाग |
Trending बातम्या