marathistatus.co

दुध आणि वासना…… – “ती वेश्या” – “एका भूकेसमोर दुसरी भूक आज हरली होती.”

 

आणि मनाला खंबीर करून बाळाच्या दुधाकरिता तिने शेवटी निर्णय घेतलाच……..

या ‘प्रसंग मालिकेचे’ नाव ती वेश्या आहे. पण ‘ती’ वेश्या नव्हतीच……….

वास्तविक स्व अनुभवांवर आधारित………

Pradip S. Nindekar

          “ती’ वेश्या”, हि कथामालिका वास्तविक स्वअनुभवांवर आधारित असून यात मला आलेले काही वास्तविक अनुभव लेखणीच्या सहाय्याने उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

          सर्वांची पहाट होते नव्या उमेदीने, नव्या विचाराने. भारत देश मंगळावर पोहचलाय आणि आमचे शास्त्रज्ञ त्याही पलीकडे कसे जाता येईल, अख्ख ब्रम्हांड कसं सर करता येईल या विचाराने रोजची सुरुवात करतात. विशेषतः बरेच जन आपण उद्या काय करणार आहोत याचे नियोजन आदल्या रात्री करून ठेवतात. किंबहुना त्यांच्या पुढील भविष्याचेही नियोजन झालेलं असतेच. स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य कसं सुरक्षित होईल या नियोजनाला पूर्णत्वास नेण्याकरिता सूर्याच्या आगमनाबरोबर त्यांची धडपड सुरु होते. पण काही व्यक्तींचे आणि कुटुंबांचे भविष्य सोडा पण आजचा दिवस कसा असणार याचे सुद्धा काही खरे नसते. नशिबाने आज काय वाढून ठेवले याची पुसटसीही कल्पना नसते. आपली आणि आपल्या कुटुंबाची एक वेळ जेवणाची सोय कसी करायची हाच त्यांच्यासमोरील भयाण प्रश्न खूप महत्वाचा असतो. यापलीकडे त्यांची विचारशक्ती पोहचुही शकत नाही. असाच एक भयाण आणि मन हेलावून टाकणारा अनुभव सादर.

छत्तीसगढ, कोरबा येथील हि गोष्ट. २००८.

          शरीराची काळजी म्हणून योगा, व्यायाम आणि जॉगिंग ने दिवसाची सुरुवात करणारे आणि काही काम नाही म्हणून ९-१० वाजतापर्यंत बिछ्याण्यातच लोळनारेही बरेच. पण सकाळी ०३  वाजता, सूर्य उगवयाला बराच वेळ असताना तिची सुरुवात झाली भंगारातील लोखंड वेचण्या करिता, गोळा करण्याकरिता. अंग झाकेल असी साडी आणि ब्लाउज. पण तेही खूप दिवस धुतले नसल्या कारणाने काळे पडलेले. कपड्यांबरोबरच तिनेही खूप दिवस आन्घोड केली कि नाही अशी शंका येत असलेली. अन्न न मिळत असल्यामुळे कृश म्हणजेच बारीक शरीर… सावळा रंग, ना केसाला तेल, कि चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी. केस विस्कटलेले, आणि हात पायावर खाजवल्यामुळे ओरबाडल्या सारख्या खुणा. हातात छोट्याश्या दोरीला बांधून एक-दिढ फुटाच्या लोखंडी रॉड, रॉडला खाली गोल आकाराचे लोहाचुम्बक चीपकलेले, खांद्यावर एका बाजूला जमा झालेले लोखंड तसेच भंगार जमा करण्याकरिता लटकवलेली एक झोळी आणि एका बाजूला कढेवर कापडात बांधून ठेवलेले कुपोषित बाळ….. ती निघाली आजच्या दिवसाकरिता आपल्या आणि बाळाच्या पोटाच्या खळगीला शांती मिळावी म्हणून आणि जगण्याकरिता अन्न जरुरी असते म्हणून त्याची सोय करण्याकरिता.

          ती पोहचली तिथे, जिथे तिला वाटत होते कि येथे आपल्याला जास्त लोखंडाचे तुकडे मिळेल अशी अपेक्षा असलेल्या ठिकाणी. म्हणजे ट्रक पोर्ट वरती. हि अशी जागा जिथे रोज शेकडो ट्रक यायचे. कोरबा जवळच बाल्को नावाचे ठिकाण आहे येथे खनिजाच्या मोठ्या मोठ्या खाणी आहेत, तसेच मोठा वीज निर्मिती केंद्र आहे, त्यामुळे या क्षेत्रात National Permit असलेले देशभरातील ट्रक फार मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीसाठी येत असतात. सहाजिकच त्यामुळे ट्रक थांबण्याची जागा असल्याकारणाने रिपेअरिंग ची दुकाने पण खूप प्रमाणात आहे. त्यामुळे ट्रक रिपेअर करताना नट, बोल्ट, स्प्रिंग असे निकामी झालेले विविध पार्ट फेकून दिले जातात. तिच्या उदरनिर्वाहाचे हेच साधन. लोहाचुम्बकला चिपकलेले लोखंड विकून येणाऱ्या पैश्यातच तिचे आणि तिच्या बाळाचे पोट भरणार होते. लोहाचुम्बकाला लोखंडाचे तुकडे चीपकले कि ती ते काढून एका बाजूच्या झोळीत टाकत होती. ज्यामुळे दुसऱ्या बाजूच्या झोळीतील बाळाच्या दुधाची सोय होणार होती.

         माल भरण्याकरिता किंवा माल खाली करण्याकरिता आलेल्या पण अजून नंबर न लागू शकल्यामुळे उभ्या असलेल्या शेकडो ट्रक मधून ती लोखंडाचा रॉड फिरवत आजच्या दिवसाची सोय करण्याच्या प्रयत्न करीत होती. पण आज साढेचार वाजले तरी पाहिजे तसे भंगार जमा झाले नव्हते. आणि काल रात्री बाळाचे पोट कदाचित भरले नसणार म्हणून त्यानेही रडणे सुरु केले. पण त्या बाळाला रडण्याचीही ताकद नव्हती. थोडेसे रडून ते बाळ मान खाली टाकून देत होतं. तिच्या मनात कालवाकालव सुरु झाली थोड्याच वेळात कोणतेतरी चहाचे दुकान सुरु होईल तेव्हा त्याच्याकडून दुध विकत घेवून बाळाला द्यावे लागणार होते. विकत घेवून म्हणजे विकत घेवूनच. . . . . याला दोन कारणे, पाहिलं म्हणजे तिच्या छातीत बाळाला पाजाण्याकरिता दूधच नव्हतं आणि दुसरं म्हणजे दुकानदार सुद्धा फुकट दुध देणार नव्हता कारण याआधी तिचा असा अनुभव होता. भंगार वाल्याचे दुकान ६.३० ला सुरु होणार होते. पण त्याला देण्याकरिता तिच्याकडे भंगार सुद्धा जमा झाले नव्हते.

          शेवटी तिच्या काळजाचा बांध सुटला आणि बाळाच्या दुधाकरिता तिने कुणालातरी भिक मागायचे ठरवले. मेहनत करून पैसे कमावण्याकरीता निघालेल्या तिला परिस्थितीने भिकारी बनवले…..

तुम्हालाही तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. लगेच क्लिक करा

          आणि तिला एका ट्रक जवळ चाळीशिताला ट्रक driver दिसला. अजून उजाडायचे बाकी होते म्हणून बाकी लोक जागे व्हायचे होते. त्याचा क्लीनर पण जागायचाच होता. तिने आशेने त्याला बघितले आणि केविलवाण्या पने बोलली “भैय्या, मेरे बच्चे को दुध पिलांना है, दस रुपये होंगे तो दोंगे क्या ?” पण बरेच दिवस घरापासून लांब असलेल्या म्हणजेच शरीराची भूक बरेच दिवसापासून न भागवलेल्या “त्या”ला संधी मिळाली. याक्षणी त्याला हवी होती कुठलीही “मादी”. ती कशी आहे, कोणत्या परीस्तिथीत आहे याच्याशी त्याला काहीही घेणेदेणे नव्हते. त्याने तिच्या मजबुरीचा फायदा घेण्याचे ठरवले… आणि तोंडात माचीस ची काडी टाकून तिला म्हणाला “फोकट मे तुम्हे कौन पैसे देगा, मुझे खुश कर दो तो मे तुम्हे दस क्या बीस रुपये दुंगा” असे बोलणे ऐकताच तिला त्याचा राग आला. पण राग दर्शवण्याची तिच्यात हिम्मतही नव्हती आणि परिस्तिथीही नव्हतीच. तिने परिस्तिथी समोर हात टेकले होते. “नही भैया, कुछ भी बोलते हो” असे म्हणून ती तिथून निघाली. पण दहापंधरा मिनिटे इकडे तिकडे फिरूनही तिला मदत करेल असे कुणी दिसले नाही. सूर्य देव अजून जागायचा होता, सूर्य देव निसर्ग नियमाने थोड्या वेळात जागणारच होता, पण माणुसकी ?????

माणुसकी कदाचित कधीच जागणार नव्हती….. 

          आणि परत बाळाने रडणे चालू करून आणखी एकदा मान खाली टाकली. तिच्या मनात काहूर माजला. बाळाची दुधाची भूक मिटविन्याकरिता आज “त्या”ची शरीराची भूक भागवावी लागणार होती. नाईलाजाने तिने आपली पावले मागे फिरवली. आणि परत आली त्या शरीर उपभोगाण्याकरिता अधीर असलेल्या माणुसरुपी जनावराकडे…..

आणि, आणि, आणि शेवटी…….

         “भैया, बीस रुपये जरूर दोंगे ना” असे म्हणून ती या कामाकरिता तयार झाली. त्याने शर्टाच्या खिशातून काढून दहा दहा च्या दोन नोटा तिच्या हातात ठेवल्या. आणि ट्रक खाली आधीच अंथरून ठेवलेल्या चादरीकडे इशारा केला. तो कदाचित रात्रभर तिथेच झोपला असावा. ती वाकून ट्रक खाली गेली. ट्रक चालून चालून पावडर सारखी झालेल्या आणि डीजेल, पेट्रोल, ग्रीस मुळे काळ्या पडलेल्या मातीवरतीच तिने बाळाची झोळी ठेवली. आणि त्या अंथरुणावरतीच सुरु झाला वीस रुपयाकरीताचा खेळ……… तो तुटून पडला तिच्या हाडामासाच्या शरीरावर. पण घाव होत होते ते तिच्या मनावर. ती आपल्या बाळाकडे काळजीपोटी पाहत होती, तिला समाधान वाटत होते कि चला आपल्या बाळाच्या दुधाची सोय झाली. आणि “त्या”चे समाधान होत होते शरीराच्या भुकेचे. एका भूकेसमोर दुसरी भूक आज हरली होती.

बाळाच्या दुधाकरिता काही वेळापूर्वी भिकारी बनल्यानंतर ती आता बनली होती वेश्या……..

          २००८ च्या काळात २० रुपये म्हणजे खूप जास्त रक्कम होती असं नाही. याआधी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, बिलासपुर, रायपूर येथील रेड लाईट एरिया मध्ये काम केल्या मुळे २००-३०० पासून १००००-१५००० पर्यंतही रेट असल्याचे निदर्शनास आले होते. पण २० रुपयाकरिता हे काम करण्याकरिता भाग पडण्यापर्यतची परिस्तिथी कधी बघायला मिळेल असा कधी विचारही केला नव्हता.

          एच आय व्ही / एड्स च्या जनजागृती विषयी सर्वेक्षणाचे काम असल्यामुळे त्याच ट्रक पोर्ट एरिया मध्ये आमच्या तर्फे “हाई रिस्क ग्रुप” पैकी एक असलेल्या ट्रक चालक यांच्या लैंगिक वर्तुवनुकेच्या माहिती संकलनाचे काम सुरु होते. हा प्रकार ज्या दिवशी घडला त्याच दिवशी सायंकाळी त्याच ट्रक चालकाकडून, साहजिकच विश्वासात घेवून आणि आपलंस करून फॉर्म भरून घेताना “तुम्ही मागील सात दिवसात लैंगिक संबंध ठेवले काय ?” या प्रश्नाचे उत्तर घेताना हा सर्व प्रकार समजाला. माहिती घेताना असे लक्षात आले कि त्याला एड्स या आजाराविषयी काहीही ज्ञान किंवा माहिती नव्हती, आणि घरापासून म्हणजेच पत्नीपासून बरेच दिवस दूर राहिल्याने शरीराची भूक भागवन्या करिता हि दुर्बुद्धी त्याला सुचली, लैंगिक संबंध ठेवताना निरोध (कंडोम) चा वापरही त्याने केलेला नव्हता, यामुळे त्याला एड्स होऊ शकतो हे जेव्हा त्याला आमच्या मार्फत समजले तेव्हा तो फारच घाबरला. घरी लहान लहान दोन मुले, पत्नी, आई आहे हे त्याने सांगितले. आता पुढे काय होईल या विचाराने तो अक्षरशः रडायला लागला. त्याच्या केस चा संपुर्ण पाठ पुरावा (Follow up) करण्याकरिता आम्ही त्या बाईला भेटवन्याची विनंती केली आणि त्याचा ट्रक पण चारपाच दिवस माल भरे पर्यंत तिथेच राहणार असल्याकारणाने तिची शोधमोहीम सुरु झाली. तेव्हा त्याने दोन दिवस शोधून तिच्याशी भेट घालवून दिली.

          वर वर्णन केल्याप्रमाणेच ती. बाळ खांद्यावरच्या कापडात बांधलेले, डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावर याआधी पाणी कधी फिरवले असेल काय माहिती. बाळाच्या हातात कुठलेतरी तुटलेले खेळणे होते. आणि हिच्या हातात लोहाचुम्बक चीपकवलेले तोच लोखंडाचा रॉड. आम्हाला मिळालेल्या ट्रेनिंग चा उपयोग करून, तिला विश्वासात घेवून आम्ही बोलते केले तेव्हा ती बोलली “क्या करते साहब, पैसे नही थे और बच्चा भी भूका था, तो ये सब पहली बार किया, नही तो मेरा बच्चा मर जाता साहब, मुझेही दो वक्त कि रोटी नही मिलती इस वजह से बच्चे के लिये मेरे भी छाती मे भी दुध नही आता. इसलिये खरीद के ही दुध पिलाना पडता है. इससे आगे ऐसा नही करूंगी, बच्चे का बाप भी दुसरे एरिया मे भंगार बिनता है लेकीन उसको दारू का शौक है, इसलिये पैसा और ध्यान दोनो नही देता. उलटा पैसे के लिये मुझसे मारपीट करता है. झुग्गी झोपडी बांधकर हि हम कूछ लोग पास वाले मैदान मे रहते है. भगवान ने हमारी किस्मत हि ऐसी लिखी है क्या करे ” असे बोलून ती रडायला लागली. त्याला समज दिली आणि तिला आम्ही गोळा करून चारशे पन्नास रुपये दिले. त्याक्षणी एवढेच आमच्या हातात होते…. पण हे चारशे पन्नास रुपये तिला किती दिवस पुरतील हाही एक प्रश्नच होता.

कदाचित तिच्या हातातील लोखंडी रॉड ला लावलेल्या लोहाचुम्बकारासाखे नशिबाचे भोग तिच्या आयुष्याला चिकटून बसले होते, आणि त्या बाळाच्या हातातील तुटलेल्या खेळण्यासारखे त्या बाळाचे भविष्यही भंग पावणार होते. फक्त ईश्वराने अशी वेळ इतर कुणावरही येवू देवू नये हीच माफक अपेक्षा…..

जिच्या हातात पाळण्याची दोरी, तिच जगाचा उद्धार करी…. ????? (खरच…. मनापासून विचार करण्यासारखा प्रश्न)

          २००० रुपयापेक्षा जास्त मेकअप वर खर्च करणाऱ्या स्त्रिया पण या समाजात आहे, (त्यांच्याशी वैर नाही आणि हे गैर ही नाही) पण बाळाच्या दुधाकरिता २० रुपये मिळावे म्हणून शरीर विकणारी ती स्त्री……

          यापुढे काही विचारही केला जात नाही आणि लिहिलेहे जात नाही……….. कारण हे लिहिताना या क्षणी माझ्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत, आणि लिहिताना अक्षरे सुद्धा धूसर होत चालले आहे. पण तिची आणि तिच्या बाळाची प्रतिमा आज १३-१४ वर्षानंतरही जशीच्या तशी माझ्या मनात तयार झाली आहे. आणि तिचा तो मजबूर, दुबळा, हीन, आजचा भारत दाखवणारा चेहरा, आणि त्या बाळाचा भुकेने व्याकुळ, मलूल, भविष्यहीन उद्याच्या भारताविषयी कल्पना करवणारा चेहरा वारंवार माझ्या अंतःकरणाला विचलित करत आहे……

प्रदीप स. निंदेकर – 9326030860

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *