marathistatus.co

|•| दिवस आठवणींचे |•|

|•| दिवस आठवणींचे |•|

बरा होता तो काळ, बरी होती ती वेळ,
गल्ली – गल्लीत चाले आमच्या मनोरंजनाचे खेळ ||धृ||

ना कशाचे टेन्शन, ना कशाचा त्रास,
आम्हीच आमच्या धुंदीत हरवत होतो राव ||१||

चांगले काय वाईट काय, उमजत नव्हते आम्हाला,
म्हणूनच तर वारंवार त्रास द्यायचो तुम्हाला ||२||

सर्व वारांपैकी आवडे रविवार,
कारण तेव्हाच आम्ही दिवसभर व्हायचो मातीत स्वार ||३||

खेळून – दमून झाल्यावर येत होतो घरी,
तेव्हाच बाबांची स्वारी होई घोड्यावरी ||४||

लगेच बाबा रागवेल तितक्यात आई यायची,
आणि तेव्हाच आईची माया डोळ्यांसमोर दिसायची ||५||

इवलेसे दप्तर इवलीसी बॉटल इवलासा बूट इत्यादींनी जायचं आम्ही शाळेत,
पण वाटायचे आम्हाला असे की आलो आम्ही माळेत ||६||

खूप खेळ रंगे मधातल्या सुटीमध्ये,
जणू काही शाळा असायची आमच्या मुठीमध्ये ||७||

शाळेत आम्ही दररोज जात होतो पायी – पायी,
शाळेतून येताना पाणी टाकत होतो ठायी ठायी ||८||

शाळेतून आल्यावर फेकायचो ते दफ्तर,
आणि लवकरात लवकर गाठायची मैदानाचे अंतर ||९||

आठवणींची आपण कधी आठवण करू शकत नाही,
आणि अश्या प्रकाराच्या आठवणी आपण विसरूनही विसरू शकत नाही ||१०||

 

तुम्हालाही तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. लगेच क्लिक करा

 

तुषार प्र. रामटेके
मो.७६६६९१६८९२
अमरावती.

Tushar Ramteke

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *