Mohagao Zilpi – सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी बघायला मिळत आहे. कृषी विभागात काम करत असताना #मोहगाव_झिल्पी या गावाशी आणि तेथिल लोकांशी संपर्क आला. आणि वरिल ही बातमी वाचून अत्यंत आनंद झाला. लाखातून एक असे आदर्श उदाहरण या गावाने आपल्यासमोर ठेवले आहे. या गावात अविरोध निवडणूक झालेली आहे. सरपंच पदी प्रमोद डाखळे यांचे सह नऊ सदस्यांची ग्रामस्थांनी अविरोध निवड केली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करून निवडणू लढविणाऱ्याची संख्या वाढत असताना मोहगाव झिल्पी हे गाव अपवाद ठरलेले आहे. या गावातून बैठक घेवून सर्व सहमतीने एका पदासाठी एकच अर्ज सादर केला आणि सर्वाची एकमताने निवड केली गेली. आणि या सर्व प्रक्रियेतून शासनाचे म्हणजेच एकंदरीत सर्व सामन्यांच्या कराचे (Tax) चे पैसे वाचवले. आणि एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवला.
पण असंख्य गावांत अजूनही प्रतिष्ठा, मान सन्मान, वर्चस्व,जातपात, धर्म, आर्थिक वरिष्ठता या सर्वांच्या निकषावर ग्रामिण राजकारणात वर्चस्व आसावं याकरिता खटाटोप होत आसल्याचे दिसून येते. यात आणखी एक बाब जी पंचायत राज मधील सर्व संस्थांच्या निवडणूकांमध्ये प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे घराणेशाही.
मतदारा जागा हो
केंद्रीय राजकारणापासून ते ग्रामपंचायत पर्यंत जर आपण अभ्यास केला, सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर कोणत्याही राजकारण्याला पक्ष, विकास, गाव, राज्य, शहर यांच्या अगोदर विचार येतो तो स्वतःचा आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा. याकरीता मतदार राजाच्या अनमोल मताचा तिळमात्र मान न ठेवता पक्षांतर, खोटी आश्वासने, राजकीय पाॕवर चा ऊपयोग, प्रसंगी पैशांचा गैरवापर हे सर्व केले जाते. तसेच स्वार्थापुरते विरोधी पक्ष, विरोधी नेता यांचा अगदी खालच्या पातळीवर जाऊन, प्रसंगी बायको, मुलगी पर्यंत जाऊन टिका केली जाते. आणि नंतर तेच नेते एकाच मंचावर येऊन गळाभेट घेतात, रात्रीचे जेवण सोबत करतात. बऱ्याच सार्वजनिक राजकारणात विरोधी असणाऱ्या नेतेमंडळीच्या मुली, सुना या एकमेकांच्या घरात आहेत,
म्हणजेच ते जवळचे नातेवाईकच आहेत…
पण झेंड्यासाठी, पक्षासाठी, नेत्यासाठी आपआपसात शत्रूत्व करुन बसतो, एकमेकांची डोकी फोडतो, अंगावर केसेस घेतो सामान्य कार्यकर्ता आणि मतदार.
सर्वांना विनंती आहे यापुढे पक्ष, वर्चस्व, प्रतिष्ठा बाजूला,ठेऊन विकास, आरोग्य, शिक्षण या बाबी नजरेसमोर ठेऊन मतदान करायला हवं, योग्य नेता निवडायला हवा. तरच आपली येणारी पिढी सुखी- समाधानी होईल. आणि त्यांचं भविष्य सुरक्षित होईल…
डाॕ. प्रदिप स. निंदेकर
९३२६०३०८६०
उपजीविका तज्ञ (२०११-२०१४)
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापण कार्यक्रम
महाराष्ट्र शासन
हिंगणा कृषी विभाग, नागपूर.