आज ३१ ऑक्टोबर, जगभरातील एक अब्जाहून अधिक हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध लोक दिव्यांचा सण दिवाळी साजरा करत आहेत. दिवाळी, ज्याला दीपावली देखील म्हणतात.
हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. नेपाळ, मलेशिया, फिजी आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते.
घरे, व्यवसाय आणि सार्वजनिक जागा दिव्यांनी उजळल्या जातात आणि फटाक्यांची आतषबाजी करतात. लोक कुटुंबियांसोबत नातेवाईकांसोबत पंच पक्वान्नांचा आस्वाद घेत भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.
दिवाळी हा संस्कृत शब्द दीपावलीपासून आला आहे, ज्याचा अर्थ “दिव्यांची रांग” आहे. दिवाळी अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय दर्शवते.
दिवाळीच्या परंपरा प्रांत आणि धर्मानुसार बदलत असल्या तरी, पौराणिक कथा आणि ऐतिहासिक कथा न्याय आणि मुक्तीच्या आहेत.
श्रीराम आणि सीता 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. कृष्णाने नरकासुराचा वध करत 16,000 स्त्रीयांना बंदिवासातून सोडवले. विष्णूने दैत्यराजा बळीला हद्दपार केल्याच्या दिवसाची आठवण म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
शिख दिवाळी “बंदि छोर दिवस” (मुक्तीचा दिवस) म्हणून साजरा करतात. शिखांचे सहावे गुरू गुरू हरगोविंद आणि ५२ हिंदू राजे तुरुंगवासातून मुक्त झाल्याचा हा दिवस आहे.
जैनांसाठी, दिवाळी हा दिवस म्हणजे त्यांचे शेवटचे आध्यात्मिक गुरू भगवान महावीर यांनी शारीरिक मृत्यू आणि आत्मज्ञान प्राप्त केल्याचा दिवस आहे.
सम्राट अशोकाने दिवाळीच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे बौद्ध लोक देखील दिवाळी साजरी करतात.
सखोल धार्मिक महत्त्व असूनही, दिवाळी हा आजचा एक सांस्कृतिक सण बनला आहे.
दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर आम्ही देखिल एक नवीन सदर सादर करत आहोत. ज्या मराठी व्यक्तींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन मराठमोळेपणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, अशा सर्वांची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मराठी स्टेटस’ या नावाला अनुसरून आम्ही सादर करत आहोत ‘मराठी पाऊल’ ही दर्जेदार लेखमालिका. यात तुम्हाला मराठी नेते, गायक, गीतकार, उद्योजक, कलाकार तसेच अगदी तुमच्या आमच्या आसपास असणारे पण पडद्यामागील व्यक्तीमत्वांची माहिती करुन दिली जाणार आहे.
तुम्हाला हे लेख वाचायला आवडतील का ? आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.
मराठी स्टेटसच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ! ही दिवाळी तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना सुखसमृद्धी आणि आनंददायी ठरावी ही श्रींचरणी प्रार्थना 🙏🏻