- मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझं तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.
2. आई: बेटा तू केस का कापत नाही?
पक्या : फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून, आता जा नांदायला
3. प्रियकर :- मला कळत नाही, तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे तयार झाले.? .
प्रेयसी :- त्यांनी मला विचारलं, पोरगं काय करतंय.? मी बोलले, पोटात लाथा मारतंय.!!
4. पक्या पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला. मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
पक्या : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या. मग बसू !!
5. शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन..
पक्या : ओके सर.. पण जरा झणझणीत बनवा.. मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो…
6. पोलीसः सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
पक्या : तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड……..
पोलीसः ते फेसबुकवर टाक, इथे गप पावती फाड
7. वडील: तुला परीक्षेत 98% पाहिजे बरा का!
पक्या : फक्त 95% ? 105% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
पक्या : पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!
8. एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो: “भावा हे इंजिनिअरिंग कॉलेज कसे आहे ?
पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहे
मी पण इंजिनिअरिंग इथेच केलेली आहे !
Pingback: All Best Marathi Jokes - marathistatus.co