दिवसातून एकदातरी हसा.. आणि आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवा. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर थोडा वेळ निवांत व्हा, टेन्शन, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.
विनोद ०१
दिवाळीत चकली, शेव,
बेसनाचे लाडू कमी खा.
रात्री 10 नंतर मोठ्या आवाजावर बंदी आहे.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
विनोद ०२
मुलगा: जर ती माझी झाली नाही तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही…..!!
.
.
.
मित्र: आणि तुझी झाली तर सर्वांची होऊन देशील का ?.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
विनोद ०३
जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?
नेने : हो, पण पैसे पडतील
जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
विनोद ०४
पहिला: मी माझ्या बायकोला महाबळेश्वरला घेऊन चाललोय…..
जाता जाता दरीत ढकलून देतो तिला !!!
दुसरा: सही……मग माझ्या बायकोलाही घेऊन जा…..दे ढकलून तिलासुद्धा.
.
.
.
.
पहिला: महाबळेश्वरहून येताना ढकलली तर चालेल का ???
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
विनोद ०५
दोन मुके उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते.
.
.
मला त्यांची दया येणार तेवढ्यात,.
.
हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
विनोद ०६
आज पेपर मध्ये जाहिरात होती.
एक साडी घ्या व 50% वाचवा
मी पेपरच फाडला व 100%वाचवले.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
विनोद ०७
मंग्या – यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे?
.
.
.
.
दिनू – बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे…
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
विनोद ०८
नातेवाईकांना फेसबुक फ्रेन्ड बनवणे
म्हणजे फुकटात cctv बसवणे.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️