marathistatus.co

Marathi Jokes मराठी दर्जेदार भन्नाट विनोद

दिवसातून एकदातरी हसा.. आणि आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवा. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर थोडा वेळ निवांत व्हा, टेन्शन, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.

 

विनोद 1 

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते…

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही…
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला ‘एक्स’
मानल आहे..!

 

 

विनोद 2 

बायको:– ऐका ना, मी मेले तर दुसरी लग्न कराल का?

नवरा:– नाही गं, असं विचारू नकोस!

बायको:– पण का नाही?

नवरा:– पहिली चूक परत करायची नाही असं ठरवलंय! 😜

 

 

विनोद 3 

पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.
एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो.  तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?   

पप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं

 

 

विनोद 4

चिंगी : मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ?
:
:
झंप्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
:
:
चिंगी : कितीजण होते धावायला. ?
:
:
:
झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी….!!!
😂😂😂😂😂😂

 

आजचे दर्जेदार मराठी स्टेटस बघण्याकरिता – क्लिक करा

 

विनोद 5

मुलगी रडत असते
मुलगा :- काय झाल ? का  रडतेस ?
मुलगी :- मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
मुलगा :- हात्तीच्या  एवढंच न! होत अस  कधी कधी. किती मार्क्स मिळाले तुला?
मुलगी :- 88
मुलगा :- आयला…. या मार्कात दोन पोरं पास झाली असती.

 

 

विनोद 6

एकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो..
माणूस – हेलो !!
मुलगा – उल्लो पुल्लो कुल्लो…
माणूस – कोण आहे बे ?
मुलगा – एक  व्यक्ती..
माणूस – ते माहित आहे..नाव सांग..
मुलगा – मी एक खोडकर मुलगा आहे..
माणूस – तुझ्या तर……कुठे राहतोस तू ?
मुलगा – पृथ्वी वर..
माणूस – ते माहित आहे…फोन का केलास ?
मुलगा – तुला परेशान करायला..
माणूस – थांब साल्या..तुझ्या बापाला बोलाव..छक्क्याची औलाद !!
मुलगा – बाबा !! मी आहे, चम्प्या…

 

 

विनोद 7

एकदा चम्प्या वर्तमानपत्रात अर्थविषयक बातम्या वाचत होता…

बातमी – Microsoft ने Yahoo Massenger ला $8.5 Billion ला विकत घेतले
.
.
.
.
.
.
.
.
चम्प्या – ओ तेरी…….. एवढा खर्च का केला ??? Yahoo
Massenger तर फुकटात डाउनलोड करता येतं….!!

 

 

विनोद 8

एक मुलगा असतो त्याचं नाव असतं ‘चड्ड्या’.
एके दिवशी तो शाळेत जातो आणि फक्त त्यानेच होमवर्क केलेला असतो.
मग टिचर म्हणते “चड्ड्या सोडून सगळ्यांनी उभे रहा”

 

 

विनोद 9

परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक काट्याने खातात,

भारतीय….

मुकाट्याने.

 

 

विनोद 10

बंड्या:- बाबा, मला गाडी घेऊन द्या.

वडील :- देवानं दोन पाय कशाला
            दिलेत..!

बंड्या :- एक किक् मारायला,
            न् एक गिअर बदलायला.
.
.
.
लय हानला.!
😂😂😂😜😃😄😂😅

 

 

No posts found.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

📲 रोज दर्जेदार मराठी स्टेटस करिता App ⬇️ करा