marathistatus.co

एक लढा स्वतःचा – Tushar Ramteke

|•| एक लढा स्वतःचा |•|

मी एका छोट्याशा खेडेगावातील शाळकरी मुलगा. मला काही ना काही लिहिण्याचे वेड आहे, त्यामुळे माझा हा एक प्रयत्न.. मनातील गोष्टी व्यक्त करताना शब्दांची सीमा नसावी, असे मला वाटते. तरीही, काही दोष आढळल्यास एक विद्यार्थी म्हणून क्षमा असावी. कारण चुका केल्यानेच माणूस आपल्या जीवनात प्रगती करू शकतो, असे वचन आहे.
मानवाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग घडून येतात. काही लळा लावणारे, तर काही धडा शिकविणारे. काही वाईट, तर काही चांगले. याचाच अर्थ असा, की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना एकच व्यक्ती सामोरे जाऊ शकते ती व्यक्ती म्हणजे “आपण स्वतः”. आपल्याला असे वाटते, की माझे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत अथवा खूप सहकार्य करणारे आहेत. पण एक गोष्ट आपण सदैव आपल्या मनाच्या कोपऱ्यात कोरून ठेवली पाहिजे, की श्रीमंत लोकांना गरिबांना मदत करणे आवडते पण तो गरीब श्रीमंत झालेला अजिबात आवडत नाही. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.

असाच एक प्रसंग मी काल सकाळी अनुभवला. तेव्हा त्या वेळी अक्षरशः माझे डोळे पाणावले. मी बघितले, की एक स्त्री तिच्या इंधनाचे ओझे डोक्यावर उचलण्याचा खूप प्रयत्न करत होती. पण तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात होते. थोडे वर आले की परत तोल जाऊन ओझे खाली पडायचे ही क्रिया तिने दोन ते तीनदा केली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे ही की तेथील एकही व्यक्ती तिला मदत करण्यासाठी सामोरे येत नव्हता. हा सर्व प्रकार मी माझ्या उघड्या डोळ्यांनी महाविद्यालयाच्या गेट जवळून बघत होतो. मला ते रहावले नाही आणि मी वेगाने धावत गेलो आणि त्यांची ती इंधनाची मोळी उचलून दिली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले ते अद्भुतच..! तो माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण होता. आणि माझ्या मनामध्ये विचार आला की कदाचित त्या ठिकाणी माझीच वाट पाहिली जात असावी. हा सर्व प्रकार बघणाऱ्या दर्शक वर्गामध्ये सुशिक्षित मुले – मुली सुद्धा होती. ”ज्या शिक्षणामुळे दुसऱ्यांना अडचणीत पाहून आपल्या मनात मदतीची उत्सुकता निर्माण होत नाही किंवा करुणा निर्माण होत नाही ते शिक्षण व्यर्थच ठरेल”, माझ्या मते. असो, हा वेगळा विषय आहे. त्यावर शिक्षण तज्ञांना चर्चा करू द्या.

तर या सर्व प्रकारांमधून आपण धडा घेऊ शकतो, की आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्यालाच लढावी लागते हे सत्य.! कोणीही आपला उद्धार करण्यासाठी प्रकट होणार नाही.

 

तुम्हालाही तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. लगेच क्लिक करा

तुषार प्र. रामटेके 
मो.७६६६९१६८९२
अमरावती.

Tushar Ramteke

Mo. 7666916892

Amravati

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *